Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक रिक्षाचालक तरुण जपानी माणसाशी गोड संवाद साधताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तुम्हालाही त्यांचा संवाद पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक रिक्षाचालक रिक्षा चालवत आहे आणि त्याच्या पाठीमागे जपानी माणूस बसलेला दिसत आहे. व्हिडीओमध्ये तु्म्हाला दिसेल की रिक्षाचालक तरुण जपानी माणसाशी हिन्ही, मराठी आणि इंग्रजी भाषेत तुटत तुटत संवाद साधताना दिसत आहे. हा मजेशीर संवाद ऐकून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल. (Marathi Rickshaw Driver takling to Japanese Man, Video Viral)

रिक्षाचालक : जपानमध्ये रिक्षा चालते का?
जपानी माणूस : नाही. तिथे फक्त टॅक्सी चालते.
रिक्षाचालक : तुमची आवडती भाषा कोणती?
जपानी माणूस : इंग्रजी आणि जपानी
रिक्षाचालक : जायला एक तास वेळ लागेल. फक्त ८ किमी आहे.
जपानी माणूस : एक तास.. बापरे
रिक्षाचालक : ८ किमी जायला जपानमध्ये किती वेळ लागतो.
जपानी माणूस : १० मिनिटे
रिक्षाचालक : खूप वेगळे आहे.

हेही वाचा : मोदी मोदी नामगजरापासून नितीन गडकरी अलिप्त; सोशल मीडियावर कौतुक, व्हायरल व्हिडीओतील सत्य काय?

या संवादानंतर जपानी माणूस आणि रिक्षाचालक हसताना दिसतो. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जपानबद्दल माहिती घेतली. लातूरकर विरुद्ध जपान पुणे तिथे काय उणे. सोप्पं नव्ह माय… व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा”

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : मोफत एन्ट्री न दिल्याने वॉटर पार्कमध्ये बुलडोझर घेऊन पोहोचला अन् केले असे काही की…; पाहा VIDEO

sopp_navh_may या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जपानमध्ये ऑटो चालते का….” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सोप नव्ह माय विषय खतरनाक केला शेठ तुम्ही मुजरा तुम्हाला मानाचा” तर एका युजरने लिहिलेय, “भावा, मन जिंकलंस तु तर” आणखी एका युजरने लिहिलेय, “इथे संवाद होतोय… भाषेची अडचण नाही आहे….छान भावा….फेमस झालास” एक युजर लिहितो, “विषय अवघड आहे, पण भाऊ खंबीर आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी रिक्षाचालकाचे कौतुक केले आहेत.