प्रसिद्ध वैज्ञानिक आयझॅक न्यूटन यांच्या गतीविषयक तीन नियमांची माहिती देणाऱ्या पुस्तकाची बांधणीची प्रत (बाऊंड कॉपी) लिलावात १४.४५ कोटी रुपये इतक्या प्रचंड रकमेला विकली गेली आहे. आजवर कुठल्याही लिलावात विकण्यात आलेले शास्त्रीय विषयावरील हे सगळ्यात महागडे छापील पुस्तक आहे.
१६८७ साली लिहिण्यात आलेले ‘प्रिन्सिपिआ मॅथेमॅटिका’ या पुस्तकाचे वर्णन शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांनी ‘आजवर कुठल्याही माणसाने केलेली सगळ्यात मोठी बौद्धिक प्रगती’ असे केले होते. बकऱ्याच्या कातडीने झाकलेल्या या पुस्तकासाठी १० कोटी रुपये इतकी किंमत येईल, अशी ‘ख्रिस्तीज’ या ऑक्शन हाऊसला अपेक्षा होती. परंतु अनपेक्षितपणे या पुस्तकाला १४.४५ कोटी रुपयांना हे पुस्तक विकले गेले.

Story img Loader