अंकिता देशकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Israel Attack Videos Viral: इस्रायल विरुद्ध हमास अशा अत्यंत संघर्षमयी वातावरणात लाईटहाऊस जर्नालिज्मला काही व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत असल्याचे लक्षात आले. हे व्हिडीओ पॅलेस्टाईनच्या युद्धातील असल्याचे सांगण्यात येत आहे. काही पॅलेस्टिनी स्वातंत्र्य सैनिक पॅराशूटमधून इस्रायलच्या हद्दीत उतरताना दिसत आहेत असे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे. सुरुवातीला काहीच युजर्सनी शेअर केलेला हा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे पण याची खरी बाजू जाणून घेतल्याशिवाय तुम्ही शेअर करण्याची चूक करू नका.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर IBRAR ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला,

jucy7off या ट्विटर वापरकर्त्याने पोस्ट केलेल्या आणखी एका व्हिडिओमध्ये पॅलेस्टिनी सैनिकांनी गाझामध्ये ४ इस्रायली लढाऊ हेलिकॉप्टर पाडल्याचा दावा केला आहे.

Aalia_khan या ट्विटर वापरकर्त्याने पोस्ट केलेला आणखी एक व्हिडिओ आम्हाला आढळला आहे. यातही असाच दावा करण्यात आला आहे.

तपास:

आम्ही आमचा तपास, पहिल्या व्हिडिओ पासून सुरु केला ज्यात, पॅराशूट मधून माणसं खाली उतरताना दिसतात.

आम्ही आमचा तपास, या व्हिडिओ वर पोस्ट करण्यात आलेले कमेंट्स तपासण्यापासून केला.

अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की हा व्हिडिओ इजिप्शियन मिलिटरी ट्रेनिंग अकादमीचा आहे.

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड केला आणि त्यातून विविध कीफ्रेम्स मिळाल्या. व्हिडिओमध्ये एक इमारत ठळकपणे दिसली, आम्ही या इमारतीचे फोटो असलेल्या फ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केले आणि त्यासंदर्भात एक ट्विट आढळले.

त्यानंतर आम्ही बॅकग्राउंड मध्ये दिसत असलेल्या इमारतीचे अधिक फोटो शोधले, ही इजिप्तची मिलिटरी अकादमी आहे ज्याचे Google मॅपवर काही फोटो आढळून आले.

https://maps.app.goo.gl/WGR4zvWYDGNZTXv88

यावरून हा व्हिडिओ इस्रायलचा नसून इजिप्तचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आम्ही दुसऱ्या व्हिडिओ चा तपास केला.

एक माणूस या व्हिडिओ मध्ये हेलिकॉप्टर वर हल्ला करत असताना दिसला.

व्हिडिओच्या स्त्रोताने आम्हाला Makadonच्या ट्विटर प्रोफाइलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओकडे नेले. वापरकर्त्याने स्पष्टपणे सांगितले की व्हिडिओ क्लिप Arma 3 या गेमची आहे.

आम्ही या पोस्ट वरील रिप्लाय देखील तपासले.

अनेक वापरकर्त्यांनी कमेंट केली होती की हे फुटेज अरमा 3 या व्हिडिओ गेमचे आहे.

आम्हाला सात महिन्यांपूर्वी YouTube वर पोस्ट केलेली तीच व्हिडिओ क्लिप सापडली, व्हिडिओला 20 दशलक्ष व्ह्यूज आहेत आणि ती Arma 3 ची असल्याचे सांगण्यात आले. डिस्क्रिप्शन मध्ये म्हंटले होते: “KA-50 battle helicopter shot down by FIM-92F advanced stinger missile | St. 77 MilSim ARMA3”

त्यामुळे हा व्हिडिओ इस्रायलचा नसून Arma 3 या व्हिडिओ गेमचा असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर आम्ही तिसरा व्हिडिओ तपासला, जो इस्त्राईलचे लढाऊ हेलिकॉप्टर खाली पाडल्याचा दावा करत होता.

आम्हाला या व्हिडिओवरही अशाच प्रकारच्या कमेंट आढळल्या, ज्याचा दावा आहे की व्हिडिओ Arma 3 या गेममधील क्लिप आहे.

आम्हाला हा YouTube शॉर्ट 4 ऑक्टोबर 2023 रोजी पोस्ट करण्यात आला असल्याचे कळले.

निष्कर्ष: इस्रायलमधील असल्याचा दावा करत शेअर करण्यात आलेले व्हिडिओ हे व्हिडिओ गेमचे क्लिप्स आहेत. व्हायरल दावा खोटा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Israel attack videos compilation of helicopter collapsed palestine army coming to attack check the reality on ground facts svs
Show comments