Gaza People on streets Fake Video : पॅलेस्टाईनमधील इस्लामी कट्टरवादी गट हमासने इस्रायलवर गाझा पट्टीतून ५ हजार रॉकेट्स डागले. त्यानंतर इस्रायलनेही हमासच्या अड्ड्यांवर आणि गाझा पट्टीतल्या अनेक ठिकाणांवर रॉकेट डागून हमासला जशास तसे उत्तर दिले. या हल्ल्यांनंतर हमास संघटना आणि इस्रायलयमध्ये युद्ध सुरू झाले आहे. या युद्धामुळे गाझा पट्टीत विध्वंस सुरू असून आतापर्यंत हजारो लोक मृत्यूमुखी पडले आहेत. शिवाय या युद्धाशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच नेहमीप्रमाणे काही फेक व्हिडीओदेखील व्हायरल होत आहेत.
सध्या असेच काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये युद्धादरम्यान अनेक लोक रस्त्यावर झोपलेले दिसत असून तो व्हिडिओ गाझा येथील असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रणाणात व्हायरल झाल्यानंतर लाइटहाऊस जर्नलिझमने फॅक्ट चेक केले. त्यानंतर व्हायरल होणारे व्हिडीओ फेक असल्याचं समोर आलं. तर लाइटहाऊस जर्नलिझमच्या तपासात हा व्हिडीओ गाझा येथील नव्हे तर दोन महिन्यापूर्वी, पोर्तुगालच्या लिस्बन शहरातील असल्याचं उघडकीस आले आहे.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर @KanhaRadhaRani ने आपल्या प्रोफाइल वर एक व्हायरल व्हिडिओ शेअर केला.
या पोस्टचं संग्रहित व्हर्जन बघा.
इतर वापरकर्तेदेखील असाच दावा करत हा व्हायरल व्हिडिओ शेअर करत आहेत.
तपास : आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आणि स्क्रीनशॉटवर रिव्हर्स इमेज सर्च करून आमचा तपास सुरु केला. यावेळी आम्हाला तोच व्हिडिओ TikTok अकाउंट ‘solocatecumenos’ वर अपलोड केलेला आढळला. लिस्बोआ आणि पोर्तुगाल या हॅशटॅगसह व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
आम्हाला तीच क्लिप YouTube चॅनेल Solo Catecumenos ने देखील अपलोड केलेली सापडली.
कॅप्शनमध्ये म्हटले आहे, अशा प्रकारे दीड लाख तरुणांनी #Lisbon #Lisbon2023 #WYD2023 मध्ये रात्र काढली. गूगल कीवर्ड सर्च वापरून, आम्हाला ६ ऑगस्ट २०२३ रोजी प्रकाशित झालेली रॉयटर्सचा रिपोर्ट सापडला.
रिपोर्टमध्ये म्हटले आहे, “पोप फ्रान्सिसने रविवारी कॅथोलिक तरुणांचा आंतरराष्ट्रीय उत्सव मोठ्या मैदानी माससह आणि स्वतःचे “माझे एक स्वप्न आहे” भाषणाने बंद केले, ते म्हणाले की त्यांना जागतिक शांततेची, विशेषतः युक्रेनची इच्छा आहे. पोर्तुगीज राजधानीतील रिव्हरसाइड पार्कमध्ये सुमारे १.५ दशलक्ष लोक त्याच्या समापन मासला उपस्थित होते, असे व्हॅटिकनने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले.”
निष्कर्ष : पोर्तुगीज राजधानी लिस्बनमधील नदीकिनारी असलेल्या उद्यानात मासच्या पूर्वसंध्येला बाहेर झोपलेल्या लोकांचा व्हिडिओ गाझा येथील असल्याचा चुकीचा दावा करून शेअर केला जात आहे.