Israel-Iran War Fact Check Video : इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान लाइटहाऊस जर्नलिझमला एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असल्याचे आढळून आले. व्हिडीओमध्ये एका ठिकाणी उभ्या असलेल्या अनेक बसेस आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या दिसत आहे. येमेनीच्या हुथी बंडोखोरांनी ड्रोनने लक्ष्यांवर यशस्वी मारा केल्यानंतर तेल अवीवमध्ये ही आग लागल्याचा दावा केला जात होता. पण, तपासादरम्यान व्हिडीओमागची एक खरी बाजू समोर आली आहे, ती नेमकी का आहे जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
X युजर @Resistanceonx99 ने दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह व्हिडीओ शेअर केला आहे.
इतर युजर्सदेखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास :
आम्ही व्हिडीओच्या स्क्रीनशॉट्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.
यावेळी आम्हाला २०२२ मध्ये अनेक फेसबुक प्रोफाइलवर हा व्हिडीओ पोस्ट केलेला आढळला.
कॅप्शनमध्ये म्हटले होते : सफेद शहरातील मध्यवर्ती भागातील बसस्थानकावर मोठी आग लागली, खालील अनेक बसेसचे मोठे नुकसान झाले.
Google Lens वर ‘अबाऊट थिस’ प्रॉम्प्टद्वारे आम्हाला एक बातमी आढळली, जिथे हा स्क्रीनशॉट एका बातमीच्या रिपोर्टमध्ये वापरला गेला होता.
रिपोर्टमध्ये म्हटले होते (अनुवाद) : सफेद शहरातील सेंट्रल स्टेशनवर (शनिवारी) पहाटे बसेसना आग लागली. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या १८ बसेसची तपासणी करत आग विझवली आणि कॉम्प्लेक्समध्ये उभ्या असलेल्या इतर बसेसचे संरक्षण केले, जेणेकरून या बसेसदेखील आगीच्या भक्षस्थानी पडू नयेत. यावेळी पोलिस घटनास्थळी आले, त्यांनी शोध घेतला, ज्यावरून जाळपोळ झाल्याचा संशय व्यक्त केला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
२०२२ मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती.
आम्हाला टाइम्स ऑफ इस्त्रायलमध्ये आणखी एक बातमी सापडली.
रिपोर्टमध्ये नमूद केले आहे : सुरक्षा पैशाच्या देयकाच्या गुन्हेगारी मागण्यांशी संबंधित असलेल्या एका संशयित हल्ल्यात उत्तरेकडील सफेद शहरात शनिवारी पहाटे १८ बसेस पेटवून देण्यात आल्या. मध्यवर्ती बसस्थानकावर झालेल्या हल्ल्यात इतर अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे, पण कोणतीही जीवितहानी झालेली नाही,
आम्हाला दोन वर्षांपूर्वी अल्जझीर्क अरबीवर अपलोड केलेला व्हिडीओदेखील सापडला.
डिस्क्रिप्शनमध्ये म्हटले आहे : इस्त्रायली ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने सांगितले की, व्याप्त गँलीलमधील सफेद शहरातील सेंट्रल स्थानकाच्या पार्किंगमध्ये आज पहाटे लागलेल्या आगीमुळे १८ प्रवासी बसेस जळून खाक झाल्या. स्थानिक माध्यमांनी प्रकाशित केलेल्या व्हिडीओ क्लिपमध्ये प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी नियुक्त केलेल्या बसेस जळाल्या होत्या, तर प्रसारण प्राधिकरणाने जाहीर केले की आगीच्या परिस्थितीची तपासणी केली जात आहे. #पॅलेस्टाईन #इस्रायल #अल जझीरा
निष्कर्ष : इराण-इस्त्रायलमध्ये सफेद शहरात १८ बसेसला आग लागल्याचा २०२२ सालचा व्हिडीओ आता इराण-इस्त्रायल संघर्षादरम्यानचा असल्याचा खोटा दावा करत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. पण, व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.