अंकिता देशकर
Israel Palestine Death Footages Video: लाइटहाऊस जर्नलिझमला एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की इस्त्रायलमध्ये मृतांचे व्हिज्युअल दाखवण्यासाठी बनावट फुटेज तयार करण्यात येत आहेत. मागील काही दिवसांपासून इस्रायल गाझा युद्धादरम्यान मृतांचे खच दाखवणारे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. अक्षरशः काळीज पिळवटून टाकणारीही काही दृश्य यामध्ये आहेत. पण हे व्हिडीओ सिनेमाच्या चित्रीकरणासारखे तयार केले जात असल्याचे व्हिडीओ पाहून लोकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. पण खरोखरच हे व्हायरल व्हिडीओ इस्त्रायलमधील आहेत का? मृतांची संख्या दाखवताना फुटेज शूट केले जात आहे का? याविषयी सविस्तर तपास जाणून घेऊया..
काय होत आहे व्हायरल?
Sulaiman Ahmed, नावाच्या एका ट्विटर प्रोफाइल ने व्हायरल व्हिडिओ शेअर केला.
इतर यूजर्स देखील हा व्हिडिओ व्हायरल दाव्यासह शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून तपास सुरू केला, त्यातून आम्हाला अनेक कीफ्रेम्स मिळाल्या. या समान दृश्यांचा एक व्हिडीओ आम्हाला चांगल्या स्क्रीन क्वालिटीसह ऑनलाईन आढळून आला.
या व्हिडिओवर आम्हाला स्पष्टपणे टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वॉटरमार्क दिसत होता. फ्री VPN द्वारे आम्ही TikTok वर व्हिडिओ अॅक्सेस करण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला कळले की व्हिडिओ TikTok वापरकर्ता Mohamad awawdeh ने हा व्हिडीओ अपलोड केला आहे. हा व्हिडिओ २१ एप्रिल, २०२२ रोजी अपलोड करण्यात आला होता.
याला अरबीमध्ये एक कॅप्शन देण्यात आले होते, ज्यात म्हटले होते की, अहमद मनसरा या मुलावर सेटलर्सच्या शत्रूंनी हल्ला केल्याचे दृश्य चित्रित होत आहे। BTS (पडद्यामागे) आम्ही कॅप्शन बद्दल गूगल सर्च केले आणि त्याबद्दलची एक बातमी आम्हाला सापडली.
रिपोर्ट मध्ये म्हटले होते की, इस्रायलने ताब्यात घेतलेल्या पॅलेस्टिनी कैदी अहमद मानसरा याच्या कथेवर प्रकाश टाकणारा पॅलेस्टिनी लघुपट आताच्या संघर्षाशी संबंध जोडून लहान लहान क्लिपमधून व्हायरल केला जात आहे. या शॉर्ट फिल्मचं नाव होतं, ‘Empty Place’. युट्युबवरही ही शॉर्टफिल्म उपलब्ध आहे.
हे ही वाचा<< हमासच्या दहशतवाद्याचा चिमुकलीसह Video व्हायरल? नेटकरी हळहळले, ‘ही’ बाजू माहित असणं महत्त्वाचं, पाहा
निष्कर्ष: एका वर्षापूर्वी आलेल्या ‘एम्प्टी प्लेस’ या शॉर्ट फिल्मचे बिहाइंड द सीन फुटेज, इस्रायलमधील मृतांचे फुटेज बनवल्याचा दावा करून चुकीच्या पद्धतीने शेअर केले जात आहेत.