Israeli Attacks Fact Check Video : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला व्हिडीओ पाहायला मिळाला. या व्हिडीओमध्ये अंत्ययात्रा सुरू असताना भीषण बॉम्बस्फोट होताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून असा दावा करण्यात आला की, इस्रायलने एका दहशतवाद्याच्या मृतदेहात स्फोटके भरली आणि तो परत केला. यावेळी भीषण बॉम्बस्फोट होत १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचा दावाही केला आहे. पण, खरंच खरंच इस्रायलने दहशतवाद्याच्या शवात स्फोटक भरुन बॉम्बस्फोट घडवून आणला का? किंवा अशी काही घटना घडली का, याबाबत आम्ही तपास सुरू केला तेव्हा एक वेगळं सत्य समोर आलं; ते नेमकं काय आपण जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
प्रच्यम नावाच्या एक्स युजरने त्याच्या प्रोफाइलवर दिशाभूल करणारा व्हिडीओ शेअर केला आहे.
इतर युजर्सदेखील हाच दावा शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून तपास सुरू केला आणि त्यातून मिळवलेल्या सर्व कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केले.
यावेळी आम्हाला YouTube चॅनेलवर एक व्हिडीओ सापडला आणि लक्षात आले की, तो व्हिडीओ १२ वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला होता.
व्हिडीओचे वर्णन (अनुवाद) : दमास्कस कंट्रीसाइड झामाल्का अंत्ययात्रेतील बॉम्बस्फोटाचा क्षण 6/30/2012 YouTube
आम्हाला abc.net या वेबसाइटवरही अपलोड केलेला एक व्हिडीओ आढळला.
कॅप्शनमध्ये म्हटले आहे : सीरियातील व्हिडीओ फुटेजमध्ये दमास्कसजवळ अंत्ययात्रेत स्फोट झाल्याचे दिसते.
काही कीवर्ड सर्च केल्यानंतर आम्हाला त्याबद्दल काही बातम्यादेखील आढळल्या.
एलए टाईम्समधील बातमीत म्हटले आहे : सीरियन शहर झामाल्का येथे शनिवारी संध्याकाळी अंत्ययात्रेदरम्यान कार बॉम्बस्फोटात किमान ८५ लोक मृत्युमुखी पडले, अशी माहिती कार्यकर्ते आणि मानवाधिकार गटांनी दिली. जमलका येथील कार्यकर्ता अबू उमर यांनी सांगितले की, आदल्या दिवशी मारले गेलेल्या दमास्कस जवळच्या शहरातील एका रहिवाशाच्या अंत्ययात्रेसाठी हे लोक एकत्र जमले होते, पण यावेळी झालेल्या स्फोटात त्यांचाही मृत्यू झाला.
अबू उमर यांनी पुढे सांगितले की, त्या व्यक्तीचे नाव अब्दुल हादी हलाबी असे होते. जेव्हा सरकारी सैन्याने त्यांच्या चौक्यांमधून शहरात प्रवेश केला, तेव्हा झालेल्या गोळीबारात ही व्यक्ती ठार झाली होती.
आम्हाला सीएनएनच्या वेबसाइटवरही अशीच एक बातमी सापडली.
निष्कर्ष :
इस्रायलने इतर दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी स्फोटकांनी भरलेल्या दहशतवाद्याचा मृतदेह पाठवला नाही. या दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल होणारा व्हिडीओ प्रत्यक्षात २०१२ च्या सीरियातील एका अंत्ययात्रेतील आहे, ज्यात कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात ८५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. हा व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.