भारतात मिठाईचे अनेक प्रकार पाहायला मिळातात, यात प्रत्येक राज्यानुसार मिठाईचे वेगवेगळे प्रकार, स्वाद आपल्याला चाखायला मिळतात. विशेष म्हणजे मिठाईच्या प्रत्येक प्रकाराला एक सांस्कृतिक, धर्मिक जोड आहे. प्रत्येक सण-समारंभाला, आयुष्यातील आनंदाच्या क्षणी कुटुंबियांचे, मित्र परिवाराचे मिठाई देऊन तोंड गोड केले जाते. या मिठाईचे वेडे फक्त भारतीयच नाही तर परदेशी लोकही आहेत. पर्यटनासाठी किंवा कामानिमित्त परदेशातून आलेले लोकही भारतीय मिठाई खाण्याचा मोह आवरु शकत नाहीत. याच भारतीय मिठाईची आता एका इस्रायलच्या अधिकाऱ्यालाही भुरळ पडली आहे. नुकताच त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ते एका भारतीय मिठाईच्या दुकानात उभे असल्याचे दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इस्रायलच्या या अधिकाऱ्यांना भारतीय मिठाई खूप आवडली आहे. त्यांनी मिठाईच्या दुकानात अगदी आनंदात सगळ्या मिठाई पाहत असल्याचा स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे, या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले की, मी आज निर्मळ आनंदाचा अनुभव घेतला! एक अतृप्त गोड मिठाई समर्पित खाद्यप्रेमी म्हणून, मला या सुंदर दुकानात जाण्याचा मार्ग सापडला. मी जिलेबी आणि लाडू खाण्याचा आनंद घेतला? अगदी मन तृप्त करणारा हा आनंद होता! आता मी अधिक चविष्ट भारतीय मिठाईच्या शोधात आहे. तुम्ही काही स्वादिष्ट मिठाईंचे पर्याय सुचवू शकता?.

गाय नीर असे या इस्त्रायली अधिकाऱ्याचे नाव आहे. फोटोमध्ये ते एका मिठाईच्या दुकानात उभे असल्याचे पाहू शकता. या दुकानात अनेक प्रकारची मिठाई पाहायला मिळत आहे. व्हायरल होत असलेल्या या फोटोला 4 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत, तर या फोटोला अनेकांची पसंती मिळत आहेत. अनेक युजर्स फोटोवर भरभरून कमेंट्स करत आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिले की – खूप सुंदर फोटो. तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, आपण भारतीय मिठाईबद्दल चांगला अभ्यास केला आहे.