भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चंद्रयान ३ मोहिम यशस्वी करत अंतराळ संशोधनात भारताचं स्थान अधोरेखित केलं. तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश बनला. यानंतर इस्रोवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांचं एक भाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात सोमनाथ हजारो वर्षांपूर्वी भारतीय ऋषींनी लावलेल्या शोधाची माहिती देत आहेत.
या व्हिडीओत सोमनाथ म्हणत आहेत, “शून्याची संकल्पना, अनंताची (इनफिनिटी) संकल्पना, बिजगणित, संख्येचं वर्गमुळ या सर्वांचा शोध महान ऋषींनी लावला आहे. हा शोध त्यांनी अतिशय सुंदर काव्यात्मकरित्या मांडला. बौधायन यांनी इसवी सन पूर्व ८०० वर्षांपूर्वी पायथागोरस प्रमेय मांडलं होतं. पायथागोरस प्रमेय फार नंतर आलं.”
व्हिडीओ पाहा :
हेही वाचा : Photos : चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरताना शेवटच्या २२ सेकंदात नेमकं काय घडलं? पाहा…
“हे सर्व ज्ञान अरब प्रवाशांबरोबर युरोपात गेलं”
“त्या काळात हे जे सर्व मांडलं गेलं ते केवळ इथंच राहिलं नाही. हे सर्व ज्ञान अरब प्रवाशांबरोबर युरोपात गेलं आणि हजारो वर्षांनंतर हे ज्ञान महान शास्त्रज्ञांच्या स्वरुपात आपल्याकडे परत आलं. हे सर्व ज्ञान इथेच निर्माण झालं आणि आपल्या भाषेत होतं,” असंही ते नमूद करताना दिसत आहेत.