भारताची अंतराळ संस्था इस्रोच्या अथक प्रयत्नांमुळे काल आपल्या देशाने एक इतिहास रचला आहे. कारण देशासाठी महत्वकांक्षी असणारी चांद्रयान ३ मोहिम काल यशस्वीपणे पार पडली आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश बनला. चांद्रयान ३ चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर देशभरात आनंदाची लाट उसळली आहे. या खास प्रसंगी महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी एक सुंदर संदेश देत आनंद व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आनंद महिंद्रा यांनी इस्रो आणि संपूर्ण देशाचे अभिनंदन करणारे एक ट्विट केले आहे. हे ट्विट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “चंद्राने आपल्याला स्वप्न पाहणारे बनवले आहे. आज जादू आणि विज्ञान एकत्र आले आहे.” त्याचबरोबर त्यांनी पुढे लिहिले की, चंद्र आपल्या मुठीत असल्याने १.४ अब्ज भारतीयांच्या मनात नवीन स्वप्ने जन्म घेतील. #chandrayaan3landing

हेही पाहा- पाकिस्तानातील लोकांनीही मान्य केलं भारताचं श्रेष्ठत्व, सोशल मीडियावर सुरु आहे ‘Congratulations Neighbors’ चा ट्रेंड

नेहमीप्रमाणे आनंद महिंद्रा यांनी ट्विट करताच ते मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत ते ट्विट १ मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले आहे, तर ५४ हजारांहून अधिक लोकांनी ते लाईक केले आहे. तर अनेकजण महिंद्रा यांच्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने शायरी लिहिली आहे, “परिंदों को मिलेगी मंजिल यकीनन, ये फैले हुए उनके पर बोलते है, अक्सर वो लोग खामोश रहते है, जमाने में जिनके हुनर बोलते है.” तर आणखी एका यूजरने लिहिलं, “चांद्रयान-३ चंद्रावर इतिहास रचण्यात यशस्वी ठरले. सर्व देशवासीयांसाठी हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. शास्त्रज्ञांचे आणि सर्व देशवासियांचे खूप खूप अभिनंदन. जय हिंद. जय भारत.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro chandrayaan 3 s successful landing driver anand mahindras special message to the countrymen jap