ISRO Chief S Somnath Dance Video: २३ ऑगस्ट हा संपूर्ण देशासाठी एक ऐतिहासिक दिवस ठरला. भारताच्या महत्वाकांक्षी चांद्रमोहीमेला यश मिळाल्याने २०१९ मधील अपयशी प्रयत्नांच्या कटू आठवणी बाजूला सारल्या गेल्या आहेत. चांद्रयान 3 ने चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्याचा तो क्षण आजही अनेक सोशल मीडिया माध्यमांवर चर्चेत आहे. पण या सुवर्णक्षणासह आणखी एक नवा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहे. चांद्रयान ३ च्या यशाचे शिल्पकार असणाऱ्या संपूर्ण भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) टीमने दणक्यात सेलिब्रेशन केल्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकरी सुद्धा कौतुक करत आहे. सध्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओमध्ये इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ त्यांच्या टीमसह डान्स करताना दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राप्त माहितीनुसार हा व्हिडीओ जुना आहे व चांद्रयान ३ च्या लँडिंगनंतरचा नाही. मात्र आता नव्याने व्हायरल होत असताना सुद्धा नेटकरी या व्हिडिओवर खूप कौतुकाचा वर्षाव करत आहेत. इस्रोच्या टीमने डान्स करण्यासाठी निवडलेल्या गाण्याविषयी सुद्धा नेटकऱ्यांना कुतूहल वाटत आहे. हे गाणं नेमकं कोणतं हे तुम्हाला ओळखता येतंय का, व्हिडीओ पाहून सांगा…

Video: ISRO प्रमुख एस. सोमनाथ यांचा डान्स व्हायरल

हे ही वाचा<< चंद्रयानाने लँडिंगपूर्वी पाठवलेला पृथ्वीचा Video पाहून नेटकरी प्रेमात! बारकाईने पाहिल्यावर लक्षात येतं की…

आता चांद्रयान ३ चा विक्रम लँडर चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीपणे उतरल्यानंतर HAZARD डिटेक्शन कॅमेरे सुरू केले जातील. लँडिंगनंतरचे धोके तपासण्यासाठी हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे निरिक्षणानंतर जेव्हा सर्वकाही ठीक असल्याचा सिग्नल मिळेल तेव्हा रोव्हर बाहेर येईल. लँडरवरून उतरताना रोव्हरची गती एक सेंटीमीटर प्रतिसेकंद इतकी असेल. रोव्हरची दोन चाकं चंद्राच्या पृष्टभागावर ठसा उमटवतील. इस्रोचा लोगो आणि अशोक स्तंभाच्या चिन्हाचा ठसा उमटवला जाणार असून त्यानंतर हा रोव्हर चंद्रावर फिरेल आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारचं परिक्षण करेल असे समजत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro chief s somnath dance video after successful landing of chandrayaan 3 on moon guess song vikram lander update svs