अंकिता देशकर

ISRO Chief S.Somnath Viral Video Dancing: चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशात उतरणारा पहिला देश म्हणून भारताने आपल्या चंद्र मोहिमेसह इतिहास रचल्यानंतर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये इस्रोचे प्रमुख डॉ. एस सोमनाथ पार्टी करताना आणि नाचताना दिसत आहेत. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगचा आनंदोत्सव साजरा करताना हा व्हिडिओ लँडिंगनंतरचा असल्याचा दावा केला जात होता.

Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
Chandra Gochar 2024
उद्यापासून सुरू होणार सुवर्ण काळ; चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना देणार पैसा, प्रेम आणि भरपूर यश
Shocking Video : Pune PMT Bus Front Glass falls off due to high speed
Pune Video : “आणखी वेगाने चालवा”, पीएमटी बसने मारला ब्रेक अन् अख्खी काच…. Viral video पाहून नेटकरी संतापले
Rahu Gochar in Kumbh Rashi
२०२५ मध्ये ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य; राहूच्या राशी परिवर्तनाने येणार गडगंज श्रीमंती
jitendra awhad
Somnath Suryavanshi : “अदृश्य शक्तींनी सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण केली”, शवविच्छेदन अहवालावरून जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत
budhaditya rajyog 2025 | surya budha gochar rashibhavishya marathi
Budhaditya Rajyog: जानेवारी २०२५ मध्ये बुधादित्य राजयोगाने ‘या’ राशी होणार कोट्याधीशांच्या मालक! लाभू शकते अपार धन
Surya Grahan 2025 And Shani Gochar
१०० वर्षांनंतर निर्माण होणार शनी गोचर आणि सुर्य ग्रहाचा संयोग! ‘या’ राशीच्या लोकांचा सुरु होईल सुवर्णकाळ, करिअर आणि व्यवसायात मिळेल यश

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Manish Bothra ने व्हायरल व्हिडिओ शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही ट्विटर वर कीवर्ड शोध चालवून आमची तपासणी सुरू केली. आम्ही ‘Dr S Somanath celebrates’ हे किवर्डस शोधले आणि एक आम्हाला एक ट्विट सापडला.

ट्विटर यूजर कुमार भानू यांनी आपल्या ट्विटमध्ये हा व्हिडिओ जुना आणि आधीच्या घटनेचा असल्याचे नमूद केले आहे. याचाच वापर करून आम्हाला ट्विटर युजर सिद्धार्थ.एम.पी यांचे आणखी एक ट्विट सापडले, जे पत्रकार आणि वायोन न्यूजचे वरिष्ठ वार्ताहर आहेत.

त्यांनी स्वतः तो व्हिडिओ पोस्ट केला होता, परंतु थ्रेडमध्ये, सिद्धार्थ यांनी नमूद केले की हा व्हिडिओ जुना आहे. ते स्वतः त्या कार्यक्रमात उपस्थित होते व तेव्हा त्यांनीच हा व्हिडीओ शूट केला होता.

कमेंट सेक्शनमध्ये सिद्धार्थ यांनी हे ही स्पष्ट केले आहे की हा व्हिडिओ जुलै २०२३ च्या पहिल्या आठवड्यातील आहे.

निष्कर्ष: इस्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांचा नाचत आणि पार्टी करतानाचा व्हायरल व्हिडिओ चांद्रयान ३ च्या लँडिंगपूर्वी जुलै महिन्यात चित्रित करण्यात आला आहे. व्हायरल केलेले दावे खोटे आहेत.

Story img Loader