इस्रोच्या शास्त्रज्ञांचं देशभरात कौतुक होत असताना बंगळुरूमध्ये इस्रोच्या एका शास्त्रज्ञासोबत घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या शास्त्रज्ञानं स्वत:च्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत पोलिसांची मदत मागितली आहे. स्कूटरवरून आलेल्या एका व्यक्तीने त्याच्या कारला लाथ मारली, शिवीगाळ केली. कारच्या डॅशबोर्डमध्ये लावलेल्या कॅमेऱ्यात ही संपूर्ण घटना रेकॉर्ड झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी ते ऑफिसला जात असताना ही घटना घडली. व्हिडिओमध्ये वाहतूक दिसत आहे. अनेक वाहने ये-जा करत आहेत. दरम्यान, एका तरुणाने त्याची स्कूटी त्यांच्या कारसमोर उभी केली आणि खाली उतरून कारजवळ येऊन गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करून धमकी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रस्ते अपघातात दरवर्षी हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागतो. खराब रस्ते, बेदारकपणे गाडी चालवणे, वाहतुकीचे नियम न पाळणे अशी अनेक कारणं अपघाला कारणीभूत ठरतात. अनेकदा अपघातून जीव वाचतो मात्र कायमचं जायबंदी व्हावं लागतं. त्यामुळे रस्त्यावर गाडी चालवताना वेग मर्यादा आणि नियम पाळणं गरजेचं आहे. सोशल मीडियावर अपघाताचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओमध्येही दिसत आहे की, आरोपी खूप संतापलेला आहे. तो इस्रोच्या शास्त्रज्ञाच्या गाडीला लाथ मारतानाही दिसत आहे. इस्रोचे शास्त्रज्ञ आशिष लांबा यांनी स्वत: हा व्हिडिओ शेअर करून बेंगळुरू पोलिसांकडे तक्रार केली आणि कारवाईची मागणी केली. हे प्रकरण उघडकीस येताच बेंगळुरू पोलिसांनी कारवाई केली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – VIDEO: लग्नाचा मांडव बनला आखाडा; नातेवाईकांमध्ये तुफान राडा, भर मंडपातच तुंबळ हाणामारी अन् पुढे…

याप्रकरणी आरोपी तरुणावर कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, लोक आता सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करत आहेत की, क्षुल्लक गोष्टींवर लोकांना एवढा राग का येतोय? एका व्यक्तीने सांगितले की, बेंगळुरूमध्ये ही एक सामान्य गोष्ट आहे. एका ट्विटर युजरने लिहिले की, ‘बहुतेक बाईकर्स असे करतात, त्यांना वाटते की संपूर्ण रस्ता त्यांचा आहे. ते त्यांना हवे तसे गाडी चालवू शकतात.’ दुसर्‍याने लिहिले, ‘हा स्कूटी रायडर खूप गोंधळलेला दिसत आहे.’ दुसर्‍या ट्विटर वापरकर्त्याने लिहिले, ‘यामध्ये काही नवीन नाही, प्रत्येकाला आता रस्त्यावर लढायचे आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isro scientist in bengaluru faces misbehaves scooty rider he kick car two times video goes viral chandrayan 3 srk