टर्कीमधील इस्तंबूल न्यायालयाने एका विचित्र प्रकरणामध्ये तब्बल ८ हजार ६५८ दिवसांची शिक्षा एका व्यक्तीला सुनावली आहे. टीव्हीवरील सूत्रसंचालकाला न्यायालयाने तंग कपडे घालून उभ्या असलेल्या महिलांमध्ये उभं राहिल्याचं प्रकरण लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यानुसार शिक्षेस पात्र असल्याचं सांगत ही शिक्षा सुनावली आहे. या महिलांचा उल्लेख संबंधित व्यक्तीने ‘मांजरी’ असा केला होता, असंही स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अदनान ओक्तार असं शिक्षा सुनावण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. अदनान हे एका वाहिनीसाठी समालोचक म्हणून काम करतात. निर्मितीवाद आणि पुराणमतवादी विचारांवर आधारित कार्यक्रमाचं ते सुत्रसंचलन करतात. मात्र एका भागादरम्यान ते तंग कपडे परिधान केलेल्या महिलांच्या घोळक्यामध्ये उभे राहून सूत्रसंचालन करत होते.

अदनान हे धार्मिक उपदेशाबरोबरच निर्मितीवाद आणि पुराणमतवादावर बोलणारे वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग टर्कीमध्ये आहे. त्यांच्या ए नाइन या वाहिनीवरुन ते आपले विचार मांडायचे. अनेकदा टर्कीमधील धार्मिक गटांनी त्यांच्या भूमिकांना कठोर विरोध केला आहे. मागील वर्षी लैंगिक षोषण, अल्पवयीन मुलांचे लैंगिक षोषण, फसवणूक, राजकीय कट रचणे, लष्कराविरोधात कट रचण्यासारख्या गुन्ह्यांसाठी त्यांना एक हजार ७५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयाने अदनान यांच्या बाजूने निर्णय देत ही शिक्षा रद्द केली होती.

नक्की वाचा >> Love At First Voice? मॉर्निंग वॉकला गाणं गुणगुणत चालणाऱ्या ७० वर्षीय इसमाच्या प्रेमात पडली १९ वर्षांची तरुणी; लग्नही केलं

लैंगिक शोषण करणे, व्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावून घेणे यासह विविध गुन्ह्यांमध्ये अदनान ओक्तार दोषी आढळले आहेत. ‘अनाडोलू’ वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार इस्तंबूलमधील गुन्हेगारी खटल्यांसंदर्भातील उच्च न्यायालयाने त्यांना आता ८ हजार ६५८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. याच प्रकरणामधील अन्य १० आरोपींनाही ८ हजार ६५८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

इस्तंबूल पोलिसांनी २०१८ मध्ये शहरात वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या छापेमारीदरम्यान अदनान यांना अटक करण्यात आलेली. आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणुकीसंदर्भातील छापेमारीच्या कारवाईदरम्यान यांना अटक झाली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Istanbul tv preacher and cult leader adnan oktar gets 8658 year jail term for sexual assault scsg