गुलाबजाम कोणाला आवडत नाहीत? क्वचित असे लोक असतील जे म्हणतील की आम्हाला गुलाबजाम आवडत नाहीत. लग्न असो, वाढदिवस असो किंवा इतर कोणताही समारंभ असो, प्रत्येक चांगल्या प्रसंगी गुलाबजाम आपल्या आनंदात आणखी भर पडत असतो. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलात तरी तुम्हाला तिथे गुलाबजाम मिळेलच. परंतु सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो तुम्हाला अजिबात आवडणार नाही. या व्हिडीओमध्ये एका दुकानदार आपल्या लाडक्या गुलाबजामवर अत्याचार करताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हाला ही डिश बनवणाऱ्याचा नक्कीच राग येईल. गुलाबजाम घेऊन या दुकानदाराने एक विचित्र डिश तयार केली आहे. आपण व्हिडीओमध्ये पाहू शकतो की एका डिशमध्ये ४ गुलाबजाम घेतले आहेत. त्यानंतर त्यावर, एखाद्या चाटवर टाकतात तसं दही, गोड आणि तिखट चटणी, शेव, सुकी पुरी अशा गोष्टी टाकून दुकानदार ही डिश खायला देतो. ही डिश चटपटीतही आहे आणि गोडही. ईशान शर्मा नावाच्या एका फूड ब्लॉगरने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये रस्त्याच्या कडेवरील एक खाद्यपदार्थ विक्रेता गुलाबजाम चाट बनवताना दिसत आहेत.

पुतिन यांच्या त्या एका निर्णयामुळे तरुणीच्या अश्रूंचा बांध फुटला; धाय मोकलून रडतानाचा व्हिडीओ व्हायरल

Video : इच्छेविरुद्ध वेश्या व्यवसायात अडकलेल्या मुलींना आधार देणाऱ्या त्रिवेणी आचार्य । गोष्ट असामान्यांची: भाग १९

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर झाला आहे. त्यांना हा प्रकार अजिबात आवडलेला नाही. ते या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकाऱ्याने म्हटलंय, “असा काय नाईलाज होता की ही डिश बनवावी लागली?” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “ही डिश बनवणाऱ्याला नरकातही जागा मिळणार नाही.” यापूर्वीही अनेकदा आपल्या आवडत्या पदार्थांवर विचित्र प्रयोग करण्यात आले आहेत. जसे की गुलाबजाम पराठा, पाणीपुरी आइसक्रिम, मॅगी पाणीपुरी. नेटकऱ्यांना हा फूड एक्स्पेरिमेंटचा प्रकार अजिबात आवडलेला नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: It is getting too much now netizens get angry after watching gulabjam chaat video pvp