“पुणे तिथे काय उणे” असे म्हणतात ते उगाच नाही. पुण्यात कधी काय होईल आणि पुणेकर कधी काय करतील याचा नेम नाही. पुणेरी पाट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुणेकरांनी आता नवा शोध लावला आहे. होय…तुम्ही योग्य तेच ऐकत आहे. पुणेकरांनी एका नव्या ऋतूचा शोध लावला आहे. एवढंच नवे तर या नव्या ऋतूचे त्यांनी नामकरणही केले आहे.
त्याचे झाले असे की पुण्यात ऐन हिवाळ्यात पाऊस पडला. त्यामुळे शहरात खरंच कोणता ऋतू सध्या सुरू आहे हेच नागरिकांना समजतच नाही. म्हणजे, घराबाहेर पडताना “स्वेटर घालून की रेनकोट घालू”, “छत्री बरोबर घेऊन की कानटोपी” अशी अस्था पुणेकरांची झाली आहे. पुण्यातील विचित्र वातावरण पाहून सर्वांनाच प्रश्न पडत आहे की, सध्या हिवाळा सुरू आहे की पावसाळा? हा गोंधळ सोडवण्यासाठी पुणेकरांनी थेट हा नवा ऋतूचे आगमन झाल्याचे जाहीर केले आणि त्याचे “हिवसाळा” असे नामकरणही केले. एवढंच नव्हे तर नव्या ऋतूचे उत्साहात स्वागतही करत आहे. सोशल मीडियावर हिवसाळ्याच्या आगमनाची पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे.
हेही वाचा – Video : काश्मीरच्या सौंदर्याला लागली दृष्ट? यंदा गुलमर्गमध्ये अजूनही बर्फवृष्टी नाही, काय आहे कारण…
हिवाळ्यात पडलेल्या पावसाची पुणेकरांनी उडवली खिल्ली
ऐन हिवाळ्यात पडलेल्या पावसाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पुणेकरांनी पोस्ट केले आहेत आणि त्याचबरोबर कॅप्शनमध्ये “हिवसाळा”असा उल्लेखही केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एकाने लिहिले, “बदलत्या वातावरणात स्वत:ची काळजी घ्या, आजारपणाची लक्षणे सुरू आहेत” तर दुसऱ्याने, या ऋतूला “थंडसाळा” असे नामकरण केले. तिसरा म्हणाला, “हिवसाळ्यात जाम गारठून भिजलो काल” चौथा म्हणाला, “पावसाळा परत आलाय दादा ,काहीतरी झोल आहे.” पाचवा म्हणाला, “किती तो गारठा (थंडी) आणि पावसाची चिक चिक” आणखी एकाने कमेंट करत सांगितले की,”हिवसाळी नाही, अवकाळी असते ते” तर दुसरा व्यक्तीने लिहिले, खूपच विचित्र आहे वातावरण” पुण्यातील स्थितीपाहून एका मुबंईकराने कमेंट केली की, “नवी मुंबईत सुद्धा हाच ऋतू आहे.” एका पुणेकरांनी कमेंट केली की, “शब्दांची स्पर्धा पुणेकरांशी कुणीच जिंकू शकतं नाही. अनेकांनी हिवसाळा या नव्य ऋतूवर मजेशीर कविताही केल्या आहेत.
हेही वाचा – युनिफॉर्म Swiggyचा, बॅग Zomatoची अन् हेल्मेट…; डिलिव्हरी बॉयने तर कमालच केली! फोटो होतोय Viral
पुण्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता : हवामान विभाग
पुण्यासाठी २०२४चा दुसरा आठवडा पावसाने सुरू झाला, ज्यामुळे अखेर मंगळवारी शहरातील किमान तापमानात घट झाली. दिवसभर हलका पाऊस, धुके आणि ढगाळ वातावरण राहिल्याने अनपेक्षितपणे थंडीचे वातावरण निर्माण झाले होते. भारतीय हवामान विभाग (IMD) ने, ” पुढील ४८ तासांसाठी दाट धुक्याचा इशारा जारी केला असून, नागरिकांना या काळात वाहन चालवताना सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. दरम्यान बुधवारी(१० जानेवारी) रोजी कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १७ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज व्यक्त केला. दरम्यान पुढील दोन दिवस पाऊस असाच सुरू राहण्याची शक्यताही वर्तवली आहे.”