Viral video: सार्वजनिक शौचालयाशी संबंधित अनेक प्रकारच्या बातम्या आणि समस्या आपण ऐकल्या किंवा वाचल्या असतील. अनेकदा सार्वजनिक शौचालयांची कमतरता आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे काही वेळा महिलांसाठी अवघड होऊन जाते. आपल्याकडे हे शौचालय स्वच्छ करण्यासाठी कर्मचारी असतात मात्र तीही शेवटी माणसचं. मात्र तुम्हाला माहितीये का पॅरिसमध्ये हेच सार्वजनिक शौचालय कुणी माणसं स्वच्छ करत नाहीत. तर पॅरिसमध्ये सार्वजनिक शौचालये स्वच्छ करण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये हे तंत्र दाखवण्यात आले आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल की हे तंत्रज्ञान भारतात लवकर यायला हवे आणि आपले शौचालयही असेच स्वच्छ असले पाहिजे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये टॉयलेट रूममध्ये कॅमेरा कसा बसवण्यात आला आहे, हे दिसत आहे. शौचालयाचे दरवाजे आपोआप बंद होतात. यानंतर, टॉयलेट कमोड बंद होतो आणि स्वच्छ होतो. यानंतर पाण्याचा जोरदार प्रवाह येतो आणि शौचालयाचा मजला आपोआप स्वच्छ होतो. शौचालयाचा मजला जाळीचा बनलेला असतो ज्यामध्ये पाणी साचत नाही आणि स्वतःच वाहून जाते. सोशल मीडियावर या तंत्रज्ञानाचे खूप कौतुक होत आहे. व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे… पॅरिसमधील सेल्फ क्लीनिंग पब्लिक टॉयलेट अशा प्रकारे काम करते.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: खेळता खेळता पाण्यात बुडाली चिमुकली; ओरडूही शकली नाही, पण पुढच्याच क्षणी झाला चमत्कार
व्हिडिओ @HowThingsWork नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत १४.५ दशलक्ष पेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे. तर व्हिडिओला ५० हजारांहून अधिक वेळा लाईक करण्यात आले आहे. यावर यूजर्स वेगवेगळ्या प्रकारे आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले…कोणी खरोखर टॉयलेटमध्ये कॅमेरा बसवू शकतो का? दुसऱ्या युजरने लिहिले..हे खरोखर धक्कादायक आहे. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… यात नवीन काय आहे? हे अनेक देशांमध्ये आहे.