भारतीय खाद्यपदार्थ हे निश्चितपणे जगातील सर्वात स्वादिष्ट पाककृतींपैकी एक आहे आणि त्याबद्दल शंका नाही. विविधता, चव आणि सर्जनशीलतेसाठी जगप्रसिद्धअसं भारतीय फूड आहे. बरेच लोक चवदार करी किंवा कोणत्याही प्रकारचे चिकन किंवा अन्य भाजीसोबत भारतीय चपाती बनवतात. आपल्या आवडत्या, लाडक्या चपातीला जेव्हा “बलून ब्रेड” असं म्हटलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, तेव्हा नेटिझन्स नक्कीच शांत राहू शकले नाहीत.
काय आहे व्हायरल पोस्टमध्ये?
व्हायरल झालेल्या फोटोमध्ये, जे कुकिस्ट नावाच्या इटालियन फूड चॅनेलचे स्निपेट आहे, चपातीला बलून ब्रेड असे वर्णन केले जात आहे. सूचनासह साहित्य लिहिले आहे आणि चपाती आपल्या देसी चपातीसारखी आहे. “फक्त पीठ, कोमट पाणी, उबदार दूध, तेल आणि कोरडे यीस्ट मिसळा. निकाल तुम्हाला अवाक करेल ” असं पोस्टमध्ये लिहलेलं आहे.
नेटीझन्सच्या प्रतिक्रिया
अपलोड झाल्यापासूनची पोस्ट २२.५ हजाराहून अधिक लाइक्ससह व्हायरल झाली आहे.
नेटिझन्स विभाजित झाले आहेत आणि कमेंट्स बॉक्समध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत.”पुढे ते तूपाला, गाय तेल म्हणतील,” एक वापरकर्ता म्हणाला. दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली, “व्वा, मी अवाक झालो आहे.”