२२ वर्षांच्या कियारा डेल अबाटे [Chiara Dell’Abate] या इटालियन स्त्रीला एखाद्या मांजराप्रमाणे दिसण्याची प्रचंड ओढ आहे आणि तिची ही ओढ, ही आवड पूर्ण करण्यासाठी तिने तिच्या या आगळ्या वेगळ्या प्रवासाला सुरुवातदेखील केली आहे. तिला एखाद्या मांजरासारखं दिसण्यासाठी तिच्या संपूर्ण शरीराचा कायापालट करावा लागणार आहे. कियारा डेल अबाटे ही सोशल मीडियावर आयदिन मोड [Aydin Mod] या नावाने प्रसिद्ध आहे. तिचा हा जगावेगळा प्रवास म्हणजेच स्वतःला मांजरामध्ये बदलण्याचा प्रवास, ती आपल्या टिक-टॉक या सोशल मीडियावरून इतरांसोबत शेअर करते आणि त्याला लाखांहून जास्त लोकं बघत आहेत.

कियारानं वयाच्या ११ व्या वर्षी आपलं पहिलं पियरसिंग [नाक, कान टोचून घेणं] करून घेतलं. तेव्हापासूनच तिला या गोष्टींबद्दल तीव्र आकर्षण वाटू लागलं होतं. आजच्या घडीला कियाराच्या शरीरावर एकूण ७२ पियरसिंग आहेत. न्यूयॉर्क पोस्टच्या अहवालानुसार, कियाराने आपल्या शरीरात बदल करून घेताना, अंगावर पियरसिंगसोबतच अजून बऱ्याच गोष्टी करून घेतल्या आहेत. जसं की, तिने तिच्या नाकाला भोकं पाडून घेतली आहेत, जिभेला मधोमध कट देऊन त्याचे दोन भाग केले आहेत. ०.८ सेंटीमीटरचे पियरसिंग आपल्या वरच्या ओठाला केलेले आहे, पण यावर ती थांबली नाही. या पलीकडे आपल्या गुप्तांगावरदेखील १.६ सेंटीमीटरचे पियरसिंग केलेले आहे.

nylon manja news in marathi
अकोल्यात नायलॉन मांजामुळे डोळाच धोक्यात… प्रशासनाच्या नाकावर टिच्चून…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mumbai Police launched drive against illegal nylon manja registering 19 cases
नागपूर : जीवावर बेतले, नाकावर निभावले; नॉयलान मांजाने महिला पोलीस कर्मचाऱ्याचे…
painted stork death loksatta news
नागपुरात नायलॉन मांजाचा पहिला बळी…
Womans leg cut due to nylon manja needs 45 stitches
अकोला : सावधान! नायलॉन मांजामुळे महिलेचा पाय कापला; तब्बल ४५ टाके…
aishwarya narkar faces trolling for wearing sleeveless blouse
स्लिव्हलेस ब्लाऊजमुळे शिव्या घातल्या, संस्कृती दाखवली…; ऐश्वर्या नारकरांनी ट्रोलर्सना विचारला जाब, ‘तो’ अनुभव सांगत म्हणाल्या…
thane Chinese manja loksatta news
ठाण्यात चिनी मांजाच्या जप्तीसाठी दुकानात धाडी, पालिकेच्या पथकाकडून आतापर्यंत एकूण ४५० दुकानांची तपासणी
Premachi Goshta actress Swarda Thigale react on troller
“रिप्लेसमेंटवाल्या भूमिका कलाकारांनी घेऊ नये…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील बदलावर युजरची प्रतिक्रिया; नवी मुक्ता म्हणाली, “आजही कलेचे…”

हेही वाचा : चोरी पकडताच चोर गेला पळून; चार पायांच्या चोराचा हा Video एकदा पहाच

पियरसिंग व्यतिरिक्त तिने ब्लेफेरोप्लास्टी [blepharoplasty] नामक एक सर्जरीदेखील करून घेतली आहे. ब्लेफेरोप्लास्टी [blepharoplasty], ही सर्जरी तुमच्या डोळ्यावरील अतिरिक्त त्वचा काढून टाकण्याचे काम करते. कियाराच्या दोन्ही हातांवर मिळून १० सबडर्मल इम्प्लांट्स [subdermal implants] केलेले आहे, तिच्या कपाळावर शिंगांप्रमाणे दिसणारे चार टेंगुळ आहेत आणि डोळ्यांमध्ये टॅटू केलेला आहे.

या सर्व गोष्टी इतक्या त्रासदायक असूनही, कियाराला मात्र त्याचा फारसा फरक पडत नाही. “खरंतर तुमचं शरीर तुम्ही बदलायला गेलात तर ते कितीही आणि तुम्हाला हवं तसं बदलू शकतं आणि ही खरोखर एक आश्चर्याची गोष्ट आहे”, असं ती म्हणते. कियारा स्वतःला मांजराच्या रूपात बदलून घेण्याचा प्रवास सुरू ठेवणार आहे आणि त्यासाठी तिच्या शरीरामध्ये ती अजून कोणकोणते बदल करणार आहे हे देखील जाणून घेऊ. कियारा पूर्ण मांजराप्रमाणे दिसावी, यासाठी ती आपल्या दातांच्या आकारात बदल करणार आहे. मांजरांचे असतात तसे तिचे डोळे दिसावे यासाठी ती तिच्या डोळ्यांचा आकार बदलून घेणार आहे आणि त्यासोबत आणखी काही नवीन टॅटूदेखील करून घेण्याचा तिचा विचार आहे.

Story img Loader