Italy Floods: इटलीत मुसळधार पावसामुळे १७ मे रोजी मोठा विध्वंस झाला आहे. आतापर्यंत ८ ते ९ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर एमिलिया रोमाग्ना भागात मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. शहरात सर्वत्र पाणी घुसले आहे. रस्ते जलमय झाले आहेत. हजारो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. आतापर्यंत हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ८ ते ९ लोकांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान अशा नाजूक परिस्थितीत माणुसकीचं दर्शन घडवणारा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, शेजाऱ्यांनी दाखवलेल्या माणुसकीचं कौतुक केलं आहे.
नाजूक परिस्थितीत माणुसकीचं दर्शन
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पुराच्या पाण्याच्या आई आणि मुलगी अडकल्याचे पाहून शेजाऱ्यांनी त्यांना मदत केली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की ती महिला तिच्या बाळाला धरून माझी मुलगी घ्या, मदत करा अशी मदतीसाठी ओरडत आहे. तिला अशा अवस्थेत पाहून दोन माणसे वाढत्या पुराच्या पाण्यातून आई आणि तरुण मुलीला वाचवण्यासाठी शेजारी पाण्यात उडी मारतात. पोहत तिच्याकडे येतात, मग त्यांच्यापैकी एकाने बाळाला धरले, दुसऱ्या पुरुषाने महिलेला धरले आणि त्यांना पुराच्या पाण्यातून काढून सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – संघर्ष कुणाला चुकलाय का! हर्ष गोयंका यांनी शेअर केला गोंडस पिल्लाचा Video
उत्तर इटलीच्या दुष्काळग्रस्त भागात बुधवारी झालेल्या पावसाने अनेक नद्यांचे पाणी शहरात आले. आणि पुरस्थिती निर्माण झाली. अशा परिस्थितीत रेस्क्यू टीमची वाट न बघता शेजाऱ्यांनी केलेली मदत कौतुकास्पद आहे.