सोशल मीडियावर फुटबॉल खेळणाऱ्या नन्सच्या एका ग्रुपचा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. एखाद्या खेळाडूप्रमाणे नन्स फुटबॉलचा आनंद लुटताना दिसत आहेत. या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. इटली हा फुटबॉल वेड्या देशांपैकी एक आहे आणि हा व्हायरल व्हिडीओ या देशातील आहे. आयजी इटालिया यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे आणि ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ बालकनीतून त्यांचं लक्ष नसताना चित्रित करण्यात आला आहे. यात चार नन फुटबॉल खेळताना दिसत आहेत. प्रत्येक टीममध्ये दोन अशी विभागणी केली आहे. हा व्हिडीओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
“इटलीमधील फुटबॉल हा केवळ सर्वात लोकप्रिय खेळ नाही तर सर्वात जास्त सराव केला जाणारा खेळ देखील आहे. परंतु सर्वांना याबाबत माहिती नाही की, गेल्या वर्षी जगातील पहिल्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचा जन्म झाला. खरं तर, चर्चच्या प्रदेशात आधीच राष्ट्रीय संघांनी बनलेली एक युरोपियन लीग आहे ज्यांचे खेळाडू पुजारीआहेत, परंतु आता केवळ महिला संघ तयार करणे शक्य झाले आहे. माजी फुटबॉलपटू आणि पुजारांच्या इटालियन पुरुष संघाचे माजी संस्थापक, मोरेनो बुकियान्टी यांचा प्रयत्नांना यश मिळत आहे. त्यामुळे इटालियन महिला राष्ट्रीय फुटबॉल संघ तयार होणं शक्य झालं आहे आणि पोपच्या मध्यस्थीबद्दल धन्यवाद.” अशी पोस्ट व्हिडीओवर लिहिण्यात आली आहे.
“सर्वात प्रतिभावान नन्सची ओळख पटली आणि सिस्टर फुटबॉल संघाचा जन्म झाला. संघाने गेल्या वर्षी जूनमध्ये मातांच्या संघाविरुद्धच्या मैत्रीपूर्ण सामन्यात पदार्पण केले होते. संघ केवळ नन्सचा बनलेला आहे. तरुण स्त्रिया आणि मुली ज्यांनी देवावरील त्यांच्या प्रेमाव्यतिरिक्त, फुटबॉलची आवड जोपासण्याचे ठरवले आहे.” असंही पुढे लिहिण्यात आलं आहे.