वडील आणि मुलगी हे एक असं नातं आहे, ज्या नात्याविषयी बोलावं तितकं कमीच आहे. ज्या वडिलांना पाहून घरातल्यांचा थरकाप उडतो, ज्यांचा घरातच नव्हे तर बाहेरही चांगलाच दरारा असतो अशा बाबांशी मुलींचं नातं म्हणजे एखाद्या मित्राप्रमाणे असतं. आहे की नाही ही गंमत. असंच एक नातं सध्या अनेकांचच लक्ष वेधत आहे. नव्यानेच पोलिस झालेल्या मुलीने आपल्या पोलिस वर्दीतल्या वडिलांना सलाम ठोकतानाचा बाप-लेकीचा फोटो सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय. या व्हायरल होणाऱ्या फोटोमधल्या बाप-लेकीच्या नात्याची चर्चा सुरूय.
ही चर्चा आहे ITBP चे उपमहानिरीक्षक एपीएस निंबाडिया आणि त्यांची मुलगी पोलिस कमांडर अपेक्षा निंबाडिया यांच्याविषयीची. इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात उपमहानिरीक्षक म्हणून एपीएस निंबाडिया हे पोलिस सेवेत आहेत. नुकतंच त्यांची मुलीग अपेक्षा हिने सुद्धा पोलिस खात्यात पाऊल टाकलंय. तिने उत्तर प्रदेशातील मुरादाबाद इथल्या डॉ. बी.आर. आंबेडकर पोलीस अकादमीमधून पदवी शिक्षण पूर्ण केलंय. पदवी घेतल्यानंतर पासिंग आऊट परेडच्या कार्यक्रमात हे दोघे बाप-लेक एकमेकांच्या समोर आले होते. नव्याने पोलिस खात्यातले नव्याने पाऊल टाकणाऱ्या या मुलीने आपला कर्तव्यधर्म पाळत पोलिस वर्दीतल्या वडिलांना सलाम ठोकलाय. बाप-लेकीच्या आयुष्यातला हा अविस्मरणीय क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय.
इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर या क्षणाचे काही फोटोज शेअर केले आहेत. आपल्या पावलावर पाऊल टाकत आपल्या मुलीनेही पोलिस खात्यात केलेला प्रवेश पाहून पोलिस वर्दीतल्या या बापाची मान मानाने उंचवली होती. आणखी एका दुसऱ्या फोटो बाप-लेकीच्या आयुष्यातील हा अविस्मरणीय क्षण पाहण्यासाठी आलेली आई बिमलेश निंबाडिया या देखील दिसून येत आहेत.
आणखी वाचा : Viral Video: काही क्षणात बोहल्यावर चढणार, पण नवरी भलतंच करत होती काम
बाप-लेकीच्या नात्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागला आहे. जेव्हा मुलगी आपण काम करत असलेल्या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकते, तेव्हा बापाच्या भावना काय असतील हे शब्दातही सांगणं कठीण आहे. आतापर्यंत २१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या फोटोला लाइक केलंय. त्याचप्रमाणे या बाप-लेकीच्या व्हायरल फोटोवर नेटिझन्स आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.