आजच्या काळात पैसा म्हणजेच सर्वकाही झाले आहे. पैसा कमावल्याशिवाय व्यक्तीला दोन वेळचे अन्न आणि पाणी देखील मिळू शकत नाही. त्यामुळे लोक पैसा कमावण्यासाठी काहीही काम करायला तयार असतात.अनेकदा लोक पैसे कमावण्यासाठी कल्पक मार्ग शोधतात. सध्या अशा प्रकारे पैसे कमावण्यासाठी एका महिलेने असा व्यवसाय सुरू केला आहे, जो ऐकून तुम्ही नक्कीच चकित व्हाल. विचित्र व्यवसायामुळे ही महिला सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. कानातील मळ विकून दररोज तब्बल ९,००० रुपये कमावते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा –VIDEO: आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय? जंगलात फिरताना अचानक आला वाघ; पाहा पठ्ठ्यानं कसं डोकं लावून वाचवले प्राण

कानातील मळ विकून कमावते पैसा

k

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, लतीशाने तिच्या TikTok चॅनेलवर या अनोख्या साइड हसलबद्दल एक व्हिडीओ पोस्ट केला, जो काही वेळातच व्हायरल झाला. ती कान स्वच्छ करण्यासाठी वापरलेल्या कॉटन बड्सवर असलेली मळ पॅक करून विकते. हे उत्पादन तिचे ग्राहक उत्सुकतेने विकत घेतात आणि चांगली किंमत मोजतात.

हेही वाचा – ताईंचा विषय लय हार्ड! गाणी ऐकत ऐकत महिलेने सहज पकडली घोरपड! Viral Video पाहून नेटकरी म्हणाले, “कोण आहेस तू?”

कानातील मळाची मोठी मागणी

गमतीशीर बाब म्हणजे, तिच्या ग्राहकांना या विचित्र उत्पादनाचे प्रचंड आकर्षण आहे.जितका जास्त मळ असेल, तितकी अधिक किंमत मोजायला ग्राहक तयार आहेत. शिवाय, लतीशा या पॅकेजेसबरोबर एक हस्तलिखित(Hand wriiten) कार्ड पाठवते, ज्यावर ती किस करून पसर्नल टच देते.

तिच्या या अनोख्या व्यवसायाने सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. काही लोकांना हा व्यवसाय घृणास्पद वाटत असला, तरी अनेक जणांनी तिच्या कल्पनेचे कौतुक केले आहे. काहींनी तर स्वतःचे वापरलेले कॉटन बड्स विकण्याचा विचारही केला आहे.