लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नाही. मुलांवर योग्य संस्कार करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. कधी काय करावे आणि काय करू नये हे मुलांना शिकवणे पालकांचे काम आहे पण अनेकदा पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होते. आपली मुल काय करत आहे पालकांनाच माहित नसते. अनेकदा पालकांच्या नकळत मुले चुकीच्या संगतीमध्ये राहतात आणि त्यांना चुकीच्या सवयी लागतात तर अनेकदा पालक मुलांच्या चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देतात. सोशल मीडियावर दोन लहान मुलांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून या मुलांच्या पालकांचे लक्ष कुठे असा प्रश्न नेटकरी विचारत आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोन मुले स्कूटरवर बसली आहेत. त्यापैकी एक स्कूटी चालवत आहे. दुसरा मागे आरामात बसला आहे. भररस्त्यावर वाहनांची ये-जा सुरु असताना इतक्या छोट्या मुलांना पालक दुचाकी चालवू कशी देतात असा प्रश्न नेटकरी विचारत आहे. या मुलांनी स्वत:बरोबर इतरांचा जीव धोक्यात टाकला आहे असेही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
इंस्टाग्रामवर _rewa_satna_mauganj या पेजवर व्हिडिओ पोस्ट केला आहे.
व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”हा व्हिडिओ रिवा जिल्ह्यातील आहे. मी त्यांच्या पालकांना सांगू इच्छितो की, त्यांनी अशा लहान मुलांना दुचाकी देऊ नयेत कारण ही मुले स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत. मी रेवा पोलिस प्रशासनाला सांगू इच्छितो की, ज्या व्यक्तीकडे वाहन आहे त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करा”
व्हिडिओ समोर आल्यानंतर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. कोणीतरी व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की,”दोघांचे मिळून देखील वय १८ वर्ष नाही.” याचा अर्थ असा की दोघांपैकी एकही जण १८ वर्षांचे नाही तरीही हे लहान मुल बिनधास्तपणे स्कुटर चालवत आहे तेही भरधाव वेगाने.
दुसऱ्याने कमेंट केली की, सायकल चालवण्याच्या वयात बाईक चालवताहेत ही मुले”
तिसऱ्यांने कमेंट केली , चूक पालकांची आहे आपल्या मुलांच्या जीवाची पर्वा नाही, बेजबाबदार पालक”
चौथ्याने लिहिले की, पालक असा धोका कसा पत्करू शकता, मी कल्पनाही करू शकत नाही.”
पाचव्याने लिहिले की, “किती चूकीचे आहे हे पालक त्यांच्या मुलांवर प्रेम करत नाही, म्हणूनच त्यांच्या आयुष्याबरोबर खेळत आहे”