मायक्रोसॉफ्ट हे आज कॉम्प्युटर जगातील खूप प्रसिद्ध नाव आहे. संगणक क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट ही आघाडीची कंपनी आहे. Microsoft Corporation ची स्थापना बिल गेट्स आणि त्यांचे बालपणीचे मित्र पॉल ऍलन यांच्यासोबत मिळून ४ एप्रिल १९७५ रोजी केली होती. ही कंपनी पुढे जाऊन संगणक बनवण्यात सर्वात लोकप्रिय कंपनी बनली. मायक्रोसॉफ्ट ची विंडो आणि अन्य सॉफ्टवेअर बाजारात लोकप्रिय झाले. बिल गेट्स यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये बिल गेट्स हे लेट शो विथ डेव्हिड लेटरमनमध्ये दिसून आले. या शोमध्ये ते इंटरनेट काय आहे हे समजावताना दिसत आहेत. यावेळी बिल गेट्स ज्या पद्धतीने इंटरनेट म्हणजे काय हे सांगत आहेत, ते ऐकून सारेच जण खदखदून हसत आहेत. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
या व्हिडीओमध्ये शोमध्ये आलेले बिल गेट्स यांना “इंटरनेट नक्की काय आहे?” असा प्रश्न केला जातो. यावर बिल गेट्स म्हणतात, “एक अशी जागा जिथे लोक माहिती प्रकाशित करू शकतात. त्यांची स्वतःची हक्काची जागा असू शकते, कंपन्याही आहेत, ताजी माहिती आहे….” यापुढे बिल गेट्स म्हणाले. “सध्या जे इंटरनेटवर चाललं आहे ते जगभर पसरत आहे.” यापुढे बोलताना लेटरमनने विचारले की, “मी ऐकलं होतं की तुम्ही इंटरनेटवर थेट बेसबॉल गेम ऐकू शकता अशी घोषणा केली होती. त्यावेळी मला थोड्या वेळासाठी असं वाटलं, संगणकावर रेडिओ वाजणार का?” असं विनोदाने लेटरमनने बिल गेट्स यांना त्या घोषणेबाबत विचारलं. जेव्हा बिल गेट्सने हव्या त्या वेळी सामना ऐकायला मिळणार यामधला “छोटा फरक” स्पष्ट केला, तेव्हा लेटरमन पुन्हा विनोद करतात आणि विचारतात, “टेप रेकॉर्डर सारखं का?” यावर सारेच प्रेक्षक हसू लागतात.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : नारी नारीवरच भारी! शाळकरी पोरींची जबरदस्त फाईट, एकमेकींच्या पार झिंज्या उपटल्या…
बिल यांनी गेट्स यांनी या शोमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आगमनाची आणि संगणक स्वतःहून विचार कसं करू शकतो, याचा अंदाज देखील व्यक्त केला. पण ते सत्यात उतरेल, याची खात्री मात्र त्यावेळी नव्हती. “ती एक अतिशय कठीण समस्या असल्याचे दिसून आले,” गेट्स म्हणाले. “खरं तर, त्यात जवळपास कोणतीही प्रगती झालेली नाही, त्यामुळे या कल्पनेचं काय होईल हे कोणालाच माहीत नाही. काही लोकांना वाटते की ते कधीच होणार नाही.” बुद्धिमान संगणकाच्या कल्पनेला त्यांनी “भयानक विचार” अशी उपमा दिली. यापुढे लेटरमन म्हणतात, “संगणक आणि इंटरनेट मध्ये पैसे नाहीत हे खूप वाईट आहे,” याचा व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आलाय. नेटकरी या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
नेटकऱ्यांच्या काही प्रतिक्रिया पाहा:
आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘ग्रॅज्यूएट चहावाली’ नंतर आता ‘महागठबंधन चहावाला’ चर्चेत!
हा व्हिडीओ १९९५ या वर्षातला आहे. बिल गेट्स हे लेट शो विथ डेव्हिड लेटरमनमध्ये आले होते. त्यावेली इंटरनेट काय आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. गेट्स मायक्रोसॉफ्टच्या पहिल्या ऑनलाइन टूलचा प्रचार करत होते, त्यावेळच्या नवीन लाँच केलेल्या इंटरनेट एक्सप्लोरर, ज्याने संगणक वापरणाऱ्या लोकांना इंटरनेट ऍक्सेस करण्यात मदत केली.