सोशल मीडियावर दररोज अनेक प्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जातात. सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेअर केल्यानंतर सर्वत्र व्हायरल होते. तसेच एखाद्या व्यक्ती एका रात्रीमध्ये फेमस होतो. खरं तर, सोशल मीडियावरील काही पोस्ट अत्यंत मनोरंजनात्मक असता यातील बरेच व्हिडीओ हे लहान मुलांचे असतात. लहान मुलांच्या खोड्या आणि त्यांची नाटके पाहून सगळ्यांचा मूड फ्रेश होतो. कदाचित याच कारणामुळे त्यांचे व्हिडीओ आवडीने पाहिले जातात. सध्या तर एक अतिशय मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये लहान चिमुकलीने कबीर सिंग चित्रपटातलं एक गाणं ऐकलंय. हे गाणं गाताना या चिमुकलीने जो सूर आळवलाय ते पाहून सगळेच अवाक झाले आहेत.

काही दिवसांपूर्वी सहदेव दिरदोचा एक व्हिडीओ समोर आला होता. व्हायरल व्हिडीओमुळे तो एका रात्रीमध्ये फेमस झाला. सध्या अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये चिमुकलीने कबीर सिंग चित्रपटातलं एक गाणं एका वेगळ्याच अंदाजात गायलंय. ज्या पद्धतीने तिने हे गाणं गायलंय ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल, हे मात्र नक्की. या व्हिडीओमध्ये गाणं गाताना चिमुकलीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहण्यासारखे आहेत. या चिमुकलीचे गाणे ऐकून सोशल मीडियावर जिकडे तिकडे या चिमुकलीची चर्चाच सुरूय.

आणखी वाचा : इतक्या मोठ्या गेंड्याला उचलून बिबट्या झाडावर चढला, VIRAL VIDEO पाहून थक्क व्हाल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली तिच्या वडिलांसोबत ‘कबीर सिंह’ मधलं ‘कैसे हुआ’ हे गाणं गाताना दिसून येतेय. दोघांनी हातात गिटार घेऊन हे गाणं गायलंय. यावेळी गाणं गाताना ही चिमुकली तिच्या वडिलांची कॉपी करताना दिसून येतेय. गिटार वाजवत ही चिमुकली आपल्या वडिलांच्या सुरात सूर मिसळून आपल्या अनोख्या अंदाजात गाणं गातेय. गाणं गाताना ही चिमुकली ज्या पद्धतीने गाण्यात रमलेली दिसतेय ते पाहून लोक तिच्या चेहऱ्यावरील हावभावाचे कौतुक करत आहेत. तिचा गोंडसपणा पाहून हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय स्क्रीन स्क्रोल करण्याची कुणाची इच्छाच होत नाही.

आणखी वाचा : मोबाईलच्या नादात पोटच्या गोळ्यालाच विसरली, VIRAL VIDEO पाहून तुम्ही पोट धरून हसाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : सिगारेट पेटवत विषारी सापाजवळ पोहोचली मुलगी, मग काय झालं पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिलीय. ‘जेव्हा गाण्याचे बोल हृदयाला स्पर्श करतात, एक जबरदस्त जोडी’. अशी कॅप्शन लिहित हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ बघता बघता इतका व्हायरल झाला की आतापर्यंत या व्हिडीओला केवळ २४ तासात आठ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो लोकांनी या व्हिडीओला लाईक सुद्धा केलंय.

Story img Loader