अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प हिने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून सोशल मीडियावर इवांकावर जोरदार टिका केली जात आहे. कॅनेडिअन राष्ट्राध्यक्षांनी ओव्हल ऑफिसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली यावेळी इवांकाही तिथे उपस्थित होती. या भेटीनंतर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर केला. यात ती ओव्हल ऑफिसमधल्या राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीवर बसली होती. तिच्या एका बाजूला ट्रम्प तर दुसरीकडे कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टीन त्रूदेवू उभे होते. जरी हे ऑफिस आता इवांकाच्या वडिलांचे झाले असले तरी त्या खुर्चीचा मान इवांकाने ठेवायला हवा होता अशी टिका तिच्यावर होत आहे.

वाचा : शेकहँड करायला कधी शिकायचं, मि. प्रेसिडेंट?

इवांका ही स्वत: उत्तम बिझनेस वुमन आहे. महिलांनी नोकरीबरोबरच व्यवसाय क्षेत्रातही यावे यासाठी इवांकाने जस्टीन यांच्यासोबत ओव्हल ऑफिसमध्ये चर्चा केली. या चर्चेनंतर इवांकाने एक फोटो शेअर केला होता. या फोटोत ती राष्ट्राध्यक्षांच्या खुर्चीत बसली होती तर तिच्या दोन्ही बाजूला अमेरिका आणि कॅनडाचे राष्ट्रध्यक्ष उभे होते. पण या फोटोवर नकारात्मक प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत. देशातील सगळ्यात जबाबदार व्यक्ती या खुर्चीवर बसते. ती फक्त खुर्ची नाही तर तिचा मानही आहे. त्यामुळे शिष्टाचाराचा भाग आणि खुर्चीचा मान ठेवत तरी इवांकाने तिथे बसायला नको होते अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.

VIRAL VIDEO : बिल क्लिंटनची नजर कोणावर खिळली? इवांका की मेलानिया?

Viral Video : अन् डोनाल्ड ट्रम्पही म्हणू लागले ‘मित्रों’

Story img Loader