अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प हिने भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. इतकंच नाही तर आपण भारतात येण्यासाठीही उत्सुक असल्याचं तिने ट्विट करून म्हटंल आहे. पुढील महिन्यात हैदराबादमध्ये होणाऱ्या GES समिटसाठी मोदींनी इव्हांकाला भारतात येण्याचं आमंत्रण दिलं होतं. इव्हांकाने ट्विट करत हिंदू, शीख आणि जैन बांधवांना दिवळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दिवाळीच्या शुभेच्छा देताना कॅनडाच्या पंतप्रधानांकडून झाली चूक, भारतीय नाराज

ओव्हल कार्यालयात साजरा करण्यात आलेल्या दिवाळी सोहळ्यातही इव्हांका सहभागी झाली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली त्यावेळी अमेरिका सरकारमधील भारतीय वंशाचे सर्व प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. ‘अमेरिकेत अनेक भारतीय राहतात. अमेरिकेच्या जडणघडणीत भारतीयांचा मोठा वाटा आहे. भारतीयांनी कला, क्रीडा, विज्ञान, तंत्रज्ञान अशा सर्वच क्षेत्रात प्रगती केली आहे. अमेरिकेत राहणारे हिंदू धर्मीय या महान देशाचाच भाग आहेत. त्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या समस्त हिंदूंना शुभेच्छा’ असं फेसबुकवर लिहित ट्रम्प यांनी सर्व भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी देखील भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. कॅनडामध्ये पार पाडलेल्या दिवाळी कार्यक्रमात ते पारंपरिक वेशात सहभागी झाले होते.

अन् एका सामान्य मुलीला खरंच स्वप्नातला ‘राजकुमार’ भेटला

Story img Loader