असं म्हणतात की आईच्या गर्भातून कोणी चोर, गुंड म्हणून जन्माला येत नाही तर अनेकदा परिस्थिती सुद्धा चुकीचं पाऊल उचलण्यास भाग पाडते. या वाक्याची प्रचिती देईल असा एक प्रसंग सोशल मीडियावर चर्चेत आहे. जबलपूरच्या लक्ष्मी मातेच्या मंदिरातील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे ज्यात एक चोर लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर उभा राहून अगदी श्रद्धेने हात जोडून दिसत आहे आणि देवीचे दर्शन घेताच हा चोर मंदिरातून दानपात्र घेऊन जात आहे. या व्हिडीओ मध्ये चोराची श्रद्धा व परिस्थिती यांचा संघर्ष पाहायला मिळत आहे.
हा अजब प्रकार मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. आपण व्हायरल व्हिडीओ मध्ये पाहू शकता की, मंदिरात दोन चोर अगदी दबक्या पावलाने आत येत आहेत. यानंतर यातील एक चोर, देवीच्या मूर्तीसमोर हात जोडून नमस्कार करत आहे. दर्शन घेतल्यावर हा चोर वळतो आणि जमिनीवरील दानपेटी उचलून ते दोघं मंदिरातून पळ काढतात.
पहा व्हायरल व्हिडीओ
दरम्यान, हा व्हिडीओ माडोताल येथील सूखा या गावातील आहे. मंदिरातील कर्मचारी व पुजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ५ ऑगस्ट रोजी घडली. या चोरांनी सर्वात आधी मंदिराच्या मुख्य दारावर लावलेले टाळे तोडून आत प्रवेश केला व नंतर मंदिरातील तीन दानपेट्या व सोबतच पितळेची मोठी घंटा व पूजेची भांडी घेऊन मंदिरातून पळ काढला. सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालेल्या व्हिडीओ मध्ये चोरांनी तोंडावर फडका बांधल्याचे दिसत आहे, अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही.
माझ्या शरीरात महिषासुर येतो आणि.. लाकूड खाणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा Video Viral, पहा
मात्र हा व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी चोराने काहीतरी गरजेपोटी केली असावी असे अंदाज वर्तवले आहेत. तसेच मंदिरांनी आपल्याकडील निधी अशा गरजूंच्या मदतीसाठी दान करावा असे सल्ले सुद्धा अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करून दिले आहेत.