Viral Video: जंगलाजवळ राहणारे लोक नेहमीच तेथील प्राण्यांच्या दहशतीखाली वावरत असतात. हे जंगलातील प्राणी शेतात, रस्त्यावर तर कधी कधी मानवी वस्तीच्या अंगणात सुद्धा फेरफटका मारतात. पण, या प्राण्यांची काही जणांना इतकी सवय झालेली असते की, हे जंगलातील प्राणी आपल्याला नुकसान पोहचवणार की नाही हे सुद्धा ते अचूक सांगतात. कारण काही जंगलातील प्राणी त्यांच्या गरजेनुसार अन्न, पाणी यांचा शोध घेत असतात. अनेकदा शोध घेत घेत ते मानवी वस्तीकडे सुद्धा घेत असतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत हत्ती अजब जुगाड करून झाडावरील फणस काढताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये हत्तीने कॅमेरामनला व्हिडीओ शूट करताना पाहिलं आहे.मात्र तो कॅमेरामॅनला कोणतेही नुकसान न पोहचवता पुढे निघून जातो. हत्ती पुढे जाऊन एका घराजवळ थांबतो. त्या घरापाशी एक फणसाचे झाड असते. त्या झाडावरील फणस हत्तीला खायचा असतो. झाडावरील फणस काढून घेण्यासाठी हत्ती एक जुगाड करतो. हत्तीच्या घराच्या छतावर त्याचे दोन्ही पाय टेकवतो. लांबलचक सोंड झाडाच्या दिशेने नेतो आणि नेमकं हत्ती काय करतो व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, हत्ती एका मानवी वस्तीत शिरकाव करताना दिसत आहे. बहुधा त्या झाडावर फणस आहेत याची कल्पना हत्तीला आधीपासूनच असावी व दररोज तो फणसाचे सेवन करण्यासाठी या मानवी वस्तीत येत असेल. तर झाडावरून फणस काढण्यासाठी हत्ती घराच्या छतावर आपले पुढचे दोन पाय टेकवतो आणि नंतर स्वतःची सोंड झाडाच्या दिशेने वळवतो आणि झाडावरुन फणस खाली जमिनीवर पाडतो. सोंडेच्या मदतीने हत्तीने झाडावरून चार ते पाच फणस जमिनीवरून खाली पाडले आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @wildtrails.in या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘हत्ती आणि अस्वलांना फणस आवडतो. जर तुम्ही जंगलाच्या किनारी भागात राहत असाल आणि तुमच्याकडे फणसाची झाडे असतील. तर हे प्राणी तुमच्या निवासी स्थानी भेट द्यायला नक्की येतील’ ; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. मात्र, हा व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरलेला दिसून येत आहे.