Jai Jawan Govinda Pathak 9 thar practice video: राज्यात पहिल्यांदाच प्रो-कबड्डीच्या धर्तीवर वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये गुरुवारी प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसार प्रो-गोविंदा स्पर्धा पार पडली. दरम्यान, प्रो-गोविंदा लीगचे पहिले विजेते होण्याचा मान मिळाला तो जय जवान दहीहंडी पथकाला. स्पर्धेत एकूण 14 संघांचा सहभाग होता. केवळ ४२.५१ सेकंदात ८ थर लावून जय जवान पथकाने जेतेपदाला गवसणी घातली आणि पहिले ११ लाख रुपयाचे बक्षिस मिळवले. तर कोकण नगर पथक आणि आर्यन्स पथकाने अनुक्रमे ४६.३० आणि ४८.०३ सेकंदात ८ थर लावून दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. दरम्यान प्रत्येकाला प्रश्न पडतो की, हे पथक इतके थर कसे लावतं, याच पथकाच्या सरावाचा एक थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
जय जवान पथक कसे करतात सराव?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तब्बल ९ थर लावण्याचा सराव करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून खरंच तुम्ही सुद्दा अवाक् व्हाल. त्यांच्या या शिस्तीचे आणि उत्साहाचे इतर गोविंदांनाही कौतुक केलंय.
जगातील सर्वात मोठं दहीहंडी पथक
जय जवान हे देशातील सर्वात मोठं दही हंडी पथक आहे. हे पथक यंदाच्या वर्षी किती थर लावणार? याकडे सर्वांचंच लक्ष असतं. साधारपणे इतर पथकं ७ ते ८ थरांची सलामी देतात. पण जय जवान पथक ९ थर लावतं. काही वर्षांपूर्वी तब्बल ५० फूट उंचावरची दहीहंडी फोडण्याचा विक्रमही त्यांनी केला होता. यासाठी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्यांची नोंद झाली आहे. अन् यंदाच्या वर्षी ते १० थर लावणार अशी चर्चा आहे. पण प्रश्न असा आहे इतकी उंच दहीहंडी ते फोडतात तरी कशी? पण या पथकातील तरुण तर दिवसभर दहीहंडी फोडण्याच्या निमित्तानं शेकडो किलोंचं वजन खांद्यावर घेतात. कारण यासाठी ते खास प्रशिक्षण घेतात. अन् या प्रशिक्षणाचा व्हिडीओ आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – उंच इमारतीच्या छतावर करत होता स्टंट; अचानक तोल गेला अन्…हृदयाचा ठोका चुकवणारा Video viral
२५ ऑक्टोबर १९८१ साली स्पेनमध्ये Josep-Joan Martínez Lozano यांनी ९ थरांचा, १२ मीटर उंचीचा, ३९ फुटांचा मानवी पिरॅमिड उभा केला होता. त्याकाळी या गोष्टीची चर्चा सर्वत्र झाली होती. मात्र दहीहंडी हा मूळ भारतीय सण. या सणाच्या विक्रमावर आपले नाव कोरले नाही ते भारतीय कसले. १० ऑगस्ट २०१२ साली प्रताप सरनाईक आणि जय जवान गोविंदा पथक संघाने, टीएमसी स्कूल ग्राउंड, ठाणे येथे हा विक्रम मोडीत काढला. त्यांनी त्यावेळी ९ थरांची, १३.३४ मीटरची म्हणजेच जवळजवळ ४३.७९ फूट उंचीची दहीहंडी उभी केली होती.