Jai Jawan Govinda Pathak 9 thar practice video: राज्यात पहिल्यांदाच प्रो-कबड्डीच्या धर्तीवर वरळी येथील इन डोअर स्टेडियममध्ये गुरुवारी प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शन आणि सूचनेनुसार प्रो-गोविंदा स्पर्धा पार पडली. दरम्यान, प्रो-गोविंदा लीगचे पहिले विजेते होण्याचा मान मिळाला तो जय जवान दहीहंडी पथकाला. स्पर्धेत एकूण 14 संघांचा सहभाग होता. केवळ ४२.५१ सेकंदात ८ थर लावून जय जवान पथकाने जेतेपदाला गवसणी घातली आणि पहिले ११ लाख रुपयाचे बक्षिस मिळवले. तर कोकण नगर पथक आणि आर्यन्स पथकाने अनुक्रमे ४६.३० आणि ४८.०३ सेकंदात ८ थर लावून दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला. दरम्यान प्रत्येकाला प्रश्न पडतो की, हे पथक इतके थर कसे लावतं, याच पथकाच्या सरावाचा एक थरारक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा