कारागृहाचे नाव ऐकले की, डोळ्यांसमोर उभी राहते ती लोखंडी सळ्या असलेली बंदिस्त खोली; जिथे गुन्हेगारांना ठेवले जाते. गुन्हेगारांना केलेल्या गुन्हाची शिक्षा म्हणून कारागृहात बंदिस्त केले जाते. तिथे गुन्हेगारांनी पुन्हा तसे गुन्हे करू नयेत म्हणून त्यांना सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात. याबाबत नुकताच देवास जिल्हा कारागृहातील एक व्हिडीओ समोर आला आहे; जो पाहून लोकांच्या मनातील कारागृहाची प्रतिमाच बदलून जाईल.
या कारागृहाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये कैदी दु:खी किंवा अस्वस्थ नसून चक्क नाचताना दिसत आहेत. यादरम्यान कैद्यांनी गुलाबी शरारा या पहाडी गाण्यावर एकच ठेका धरत मनसोक्त नाचण्याचा आनंददेखील लुटला आहे. कैद्यांनी ज्या स्टाईलमध्ये डान्स केला, त्याने लोकांची मने जिंकली आहेत.
पहाडी गाण्यावर कैद्यांनी केलेला डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होत आहे. यावेळी तीन कैद्यांच्या जुगलबंदीचा हा व्हिडीओ लोकांची मने जिंकत आहे. यावेळी प्रत्येकाच्या डान्स स्टेप्स अगदी सिमिलर आणि एनर्जी लेव्हल पाहण्यासारखी होती. त्यांचा डान्स परफॉर्मन्स लोकांना खूप आवडला आहे.
या व्हिडीओवर लोकांनी खूप कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “त्यालाही अशा तुरुंगात जायचे आहे.” तर दुसऱ्या युजरने कमेंट केली, “असा जेल असेल, तर गुन्हेगारांना कशाची भीती राहणार?” अनेकांनी अशा कार्यक्रमांचे कौतुक केले आणि असे कार्यक्रम कैद्यांसाठी चांगले असल्याचे लिहिले. हे त्यांना चांगले लोक बनण्यास मदत करतील, असेही त्यांनी म्हटले आहे.