Jaipur couple video viral: आजच्या तरुण पिढीने सगळीच लाज सोडली आहे का असाच प्रश्न पडला आहे. ज्या गोष्टी चार भिंतीत केल्या जात होत्या त्या आता दिवसाढवळा रस्त्यावर केल्या जात आहेत. हे अशाप्रकारे कृत्य समाजात आक्षेपार्ह आहे. शिवाय रस्त्यावर अशा गोष्टी करणे म्हणजे वाहतुक नियमाचं उल्लंघनदेखील आहे.भर दिवसा रस्त्यावर धावत्या स्कूटीवर रोमान्स करताना एक जोडप कॅमेऱ्यात कैद झाले आहे. वाहतूक नियमाचं उल्लघंन केल्याप्रकरणी पोलिसांनी अशा बाइकस्वारांवर कारवाईही केली. मात्र पोलिसांचा धाक या प्रेमी युगुलांवर दिसून येत नाही आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये एक तरुण जोडपं चालत्या स्कूटीवर रोमान्स करत असल्याचं दिसून येतं.

हा व्हिडीओ जयपूरच्या सांगानेर भागातील असून चालत्या बाईकवर रोमान्स करत असलेल्या त्या जोडप्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये दोन तरुण आणि एक तरुणी दुचाकीवरुन जाताना दिसत आहेत. दुचाकीवरील एक तरुण दुचाकी चालवत आहे, तर त्याच्या मागे दुसरा तरुण बसला आहे आणि एक मुलगीही बसली आहे.

A mechanism has been created by the ST administration to complain to the depot head about any problem in the journey of the ST Mumbai news
एसटी प्रवासात अडचण आल्यास थेट आगार प्रमुखांना फोन करा
Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती,…
peoples lives will be saved due to the remote operated device
खरंच आता कुणी पाण्यात बुडणार नाही? रिमोटवर चालणाऱ्या यंत्रामुळे वाचणार लोकांचा जीव, VIDEO होतोय व्हायरल
article about sahyadri sankalp society information
सर्वकार्येषु सर्वदा : पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्याचा ‘संकल्प’
What to do when the car is stuck in traffic
ट्रॅफिकमध्ये गाडी अडकल्यावर काय काळजी घ्यावी? ‘या’ सोप्या टिप्सने होईल मदत
Traffic jam on Ghodbunder road thane
‘ठाणेकर’ होऊन रहाण्याच्या हौसेवर कोंडीचे विरजण
Bhandup, security guard, Security Guard Brutally Beaten to Death, murder, gym trainer, entry dispute, Dream Society, Mumbai, arrest, police
इमारतीमध्ये जाण्यास रोखल्याने सुरक्षा रक्षकाची हत्या
Gyanradha Multistate, cheated, arrest,
तब्बल ३,५१५ कोटींनी फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या प्रमुखांना अखेर ठोकल्या बेड्या

ट्रॅफिक पोलिसांनी घेतला शोध

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जयपूर ट्रॅफिक पोलिसांना त्या दुचाकीचा शोध घेतला आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ट्रॅफिक पोलीस डीसीपी प्रल्हाद सिंग कृष्णनिया यांनी याबाबत स्पष्टपणे सांगितले आहे की, दुचाकीच्या नंबर प्लेटच्या आधारे त्यांची ओळख पटवून कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांच्या पथकाने चालकावर एमव्ही कायद्यानुसार कारवाई केली गेली आहे. तसेच त्यांना दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.

हेही वाचा >> Gautami Patil: पाव्हणं जेवला काय? गौतमी पाटीलने चुलीवर थापल्या भाकऱ्या, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

यादरम्यान या दोघांना पाहून सगळेच हैराण झाले. कोणीतरी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अशा प्रकारे रस्त्यावर हे कृत्य करणं जोडप्यासाठी फक्त धोकादायकच नाही तर वाहतुकीच्या नियमांचंही उल्लंघन असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. यासोबतच सामाजिकदृष्ट्या ही घटना अत्यंत अशोभनीय आहे. जोडप्याला रस्त्यात असं कृत्य करताना पाहून मुलांवरही परिणाम होईल, असं अनेकजण म्हणाले