Jaipur Fact Check Video : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडियावर आणि त्यातही विशेषत: YouTube वर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले आहे. हा व्हिडीओ जयपूरमधील जातीय दंगलीचा असल्याचा दावा करीत व्हायरल केला जात आहे. त्यामध्ये एका विशिष्ट समुदायाचे लोक रस्त्यावर हातात लाठ्या-काठ्या घेऊन दिसत आहेत. पण, खरोखर जयपूरमध्ये अशी कोणती घटना घडली होती का? याबाबत आम्ही सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या भयंकर घटनेमागची एक खरी बाजू समोर आली आणि ती नेमकी काय आहे ते जाणून घेऊ…

काय आहे दावा?

यूट्यूब चॅनेल दिनेश सैनने आपल्या चॅनेलवर व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओचे अर्काइव्ह व्हर्जन इथे बघा.

इतर वापरकर्तेदेखील तोच दावा करीत हा व्हिडीओ पोस्ट करीत आहेत.

तपास :

आम्ही व्हिडीओमधून कीफ्रेम्स मिळवून आणि नंतर त्यावर रिव्हर्स इमेज सर्च घेऊन तपास सुरू केला.

कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आम्हाला ७ ऑगस्ट रोजी सैनी समाज नावाच्या इन्स्टाग्राम चॅनेलवर एक व्हिडीओ सापडला.

बांग्लादेश फॅक्ट चेक

या व्हिडीओवर बांगलादेश, असे लोकेशन लिहिले होते.

आम्हाला एक बातमीदेखील सापडली; ज्यात व्हिडीओमध्ये पाहिल्याप्रमाणे समान स्थान दर्शविले आहे.

https://www.bongonewsbd24.com/%E0%A6%9A%E0%A6%9F%E0%A7%8D%E0%A6%9F%E0%A6%97%E0%A7%8D%E0%A6 %B0%E0%A6%BE%E0%A6%AE%E0%A7%87-%E0%A6%9B%E0%A6%BE%E0%A6%A4%E0%A7%8D%E0%A6% B0%E0%A6%B2%E0%A7%80%E0%A6%97%E0%A7%87%E0%A6%B0-%E0%A6%B8%E0%A6%99/

बातमीचे शीर्षक होते : चितगावमध्ये जुबो लीग – छात्र लीगच्या आंदोलकांचा संघर्ष; घटनास्थळी बीजीबी तैनात

बातमीत नमूद करण्यात आले आहे : चितगावमध्ये आरक्षणातील सुधारणेसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर छात्र लीग आणि जुबो लीग यांचा संघर्ष झाला. या संघर्षात तीन जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन विद्यार्थी व एका पादचाऱ्याचा समावेश आहे. या चकमकीत शेकडोहून अधिक आंदोलक आणि छात्र लीग-युथ लीगचे कार्यकर्ते जखमी झाले. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी चितगावमध्ये बीजीबीच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे.

आम्हाला YouTube शॉर्ट्सवर असाच एक व्हिडीओ सापडला.

तपासाच्या पुढील टप्प्यात आम्ही बांगलादेशातील सीनियर फॅक्ट चेकर तौसिफ अकबर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी तो व्हिडीओ बांगलादेशातील चितगाव येथील असल्याची पुष्टी केली.

आम्ही गूगल मॅपवर व्हिडीओचे लोकेशनदेखील तपासले, त्यावेळी आम्ही त्या व्हिडीओमध्ये दिसत असलेला फ्लायओव्हर आणि ते ठिकाणदेखील शोधले.

आम्हाला चितगावमधील फ्लायओव्हरजवळील रस्त्यावर त्रिकोणी रचना आढळली, जी व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या रस्त्यावरील त्रिकोणी रचनेसारखीच आहे.

https://www.google.com/maps/@22.3687363,91.8443464,3a,75y,234.37h,87.92t/data=!3m7!1e1!3m5!1sZmxcCCPMDM5UYdl5-z498w!https2Fxtreeview! .googleapis.com%2Fv1%2Fthumbnail%3Fcb_client%3Dmaps_sv.tactile%26w%3D900%26h%3D600%26pitch%3D2.080594562844027%26panoid%3DZm562844027%26panoid%3DZm56%MD52527%26panoid%3DZm56%MD524Y 34.36529915721582!7i16384!8i8192?coh=205410&entry=ttu&g_ep =EgoyMDI0MDkyMy4wIKXMDSOASAFQAw%3D%3D

निष्कर्ष : बांगलादेशातील निषेधाचा व्हायरल व्हिडीओ भारतातील जयपूरमधील अलीकडचा असल्याचा खोटा दावा करीत व्हायरल केला जात आहे. पण, व्हायरल केला जाणारा दावा दिशाभूल करणारा आहे.