सध्याच्या विज्ञानयुगात कुंडली पाहून कोणी रुग्णाचा उपचार करत असल्याचं तुम्ही ऐकलंत का? पण हे खरं आहे. जयपूरमधील एका रुग्णालयात रुग्णांवर उपचार करण्यासाठी चक्क कुंडलीचा वापर केला जातो. वैशाली नगरमध्ये असणाऱ्या त्या रुग्णालयाचे नाव संगीता मेमोरियल हॉस्पिटल असे आहे. रूग्णालयातील डॉक्टरांच्या मते ज्योतिषशास्त्र फक्त रोग ओळखण्यासाठीच नव्हे तर त्यांच्यावर मानसोपचार पद्धतीने उपचारासाठीही मदत होत आहे.
रुग्णालयात सर्जन म्हणून काम कराणारे डॉ. कुलकर्णी म्हणतात, ‘ आम्ही रूग्णालयात ज्योतिषशास्त्र आणि मेडिकल सायन्सचा ताळमेळ करण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय संसकृतीमध्ये ज्योतिषशास्त्राचे अनन्यसाधारण महत्व आहे. आमच्या रूग्णालयात अखिलेश शर्मा नावाचे ज्योतिषी आहेत. रूग्ण उपचारासाठी आल्यानंतर प्रथम त्याची कुंडली पाहिली जाते. त्याच्या ग्रहाचे मूल्यांकन केले जाते. अशाप्रकारे मेडिकल आणि ज्योतिषशास्त्रच्या परिणामाचे मुल्यांकन केले जाते. त्यानंतर डायग्नोसिसच्या आधारावर उपाचर केला जातो. ‘
आतापर्यंत ७० रूग्णांवर अशा पद्धतीने उपचार केला आहे. ज्येतिष्यांनी रोगाबाबत सांगितलेलं सर्व मेडिकल डायग्नोसिसमध्ये आले आहे. अशा उपचारावर रूग्णही समाधानी असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
‘प्रतिदिवस २० ते २५ कुंडली पाहतो. येथे आम्ही रोगाचे निदान करण्यासाठीच ज्योतिषशास्त्राचा वापर करण्यात येतो. उपचार मेडिकल सायन्सनुसारच केला जातो. ज्योतिषशास्त्रामुळे रोगाचे योग्य निदान होते आणि रुग्णाचा वेळ वाचतो, असे पंडित अखिलेश शर्मा म्हणाले.’
संगीता मेमोरियल हॉस्पिटलमध्ये विज्ञान आणि ज्योतिष यांना एकत्रित करून एक नवीन अभ्यासक्रम सुरू करणार आहेत. त्या अभ्यासक्रमाचे नाव एस्ट्रोनॉमिकल सायन्सेज असे आहे. या हॉस्पिटलमध्ये २२ जणांचा स्टाफ आहे. त्यामध्ये पाच डॉक्टरांसह पंडित अखिलेश शर्माही सहभागी आहेत.