Jaipur Truck Blast Fact Check Video : राजस्थानमधील जयपूर-अजमेर रस्त्यावर २० डिसेंबरला एका एलपीजी टँकरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात जवळपास ११ हून अधिक लोकांचा होरपळून मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. हा अपघात इतका भीषण होता की, होरपळलेल्या लोकांच्या मृतदेहाचे केवळ अवशेष हाती लागले आहेत. या भीषण अपघातानंतरचे अंगावर काटा आणणारे काही व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, लाइटहाऊस जर्नलिझमलाही या घटनेसंदर्भात दावा करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना आढळून आला, ज्यात संपूर्ण शरीरावर पांढऱ्या बँडेज बांधलेले काही लोक रस्त्यावरून चालताना दिसतायत. त्यांच्या आजूबाजूला लोकांची मोठी गर्दी जमा झाली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ जयपूर एलपीजी टँकर स्फोटात होरपळलेल्या लोकांचा असल्याचा दावा करत व्हायरल केला जात आहे.

काय होत आहे व्हायरल?

इन्स्टाग्राम युजर रोहित यादव रावने दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह हा व्हिडीओ शेअर केला आहे.

truck driver lost control crashing into parked container on Mumbra Bypass Road
मुंब्रा बायपासवर अपघात चालक जखमी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
Kurla accident case CCTV from bus seized Mumbai news
कुर्ला अपघात प्रकरणः बसमधील सीसीटीव्ही ताब्यात, २५ जणांचा जबाब नोंदवला
Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : चालकाने क्लचऐवजी ॲक्सिलेटर दाबला? कुर्ला दुर्घटनेतील सर्वांत मोठी अपडेट समोर!
Cylinder explosion in Badlapur one injured
Cylinder explosion : बदलापुरात सिलेंडरचा स्फोट, एक जखमी

इतर युजर्सदेखील हाच व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही इनव्हिड टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून आणि यावरून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला.

यावेळी आम्हाला YouTube वर अपलोड केलेले अनेक सारखे व्हिडीओ मिळाले. अशाच एका व्हिडीओमध्ये @masum_baccha_08 हा वॉटरमार्क होता.

त्यानंतर आम्ही या व्यक्तीचे Instagram खाते शोधले. हनुमान जाटवा या युजरने असेच अनेक व्हिडीओ अपलोड केले होते.

पण, मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला तो एक व्हिडीओ फक्त दोन दिवसांपूर्वी अपलोड करण्यात आला होता.

तर पहिला असाच व्हिडीओ सात दिवसांपूर्वी अपलोड करण्यात आला होता.

या व्हिडीओंच्या शेवटी एक वाहन दिसत आहे, ज्याची नोंदणी क्रमांक प्लेट RJ 08 ने सुरू झाली होती, ज्याबाबत शोध घेतल्यावर आम्हाला आढळले की, नंबर प्लेट राजस्थानमधील बुंदीची आहे.तसेच या अकाउंटवरील व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात असलेल्या व्हिडीओंच्या तुलनेत स्पष्ट दिसत होते, तसेच त्या व्हिडीओंवर ‘देई, बुंदी’चा लोकेशन टॅग देण्यात आला होता. हा व्हिडीओ १९ डिसेंबर २०२४ रोजी अपलोड करण्यात आला होता, म्हणजे अपघाताच्या एक दिवसाआधी.

व्हिडीओमध्ये कॅप्शनदेखील होती, ‘बडोडिया की डी’, आम्ही यावर यूट्यूब कीवर्ड सर्च केला, ज्यामुळे आम्हाला यूट्यूब व्हिडीओ मिळाला. हा व्हिडीओ बडोदियामधील प्रसिद्ध दिवाळीतील घास भैरू महोत्सवाचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.

त्यानंतर आम्ही हिंदी आणि इंग्रजी भाषेतील विविध कीवर्डसह इन्स्टाग्रामवर या व्हिडीओचा शोध घेतला आणि व्हायरल व्हिडीओसारखाच एक व्हिडीओ सापडला.

https://www.instagram.com/share/_8JsQdmwi

ही रील ७ नोव्हेंबर रोजी अपलोड करण्यात आली आणि कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, दिवाळीनिमित्त बडोदियाच्या रस्त्यावर दिसल्या मम्मी.

बातम्यांनुसार २० डिसेंबर रोजी जयपूर-अजमेर महामार्गावरील भांक्रोटाजवळ हा अपघात झाला, ज्यामध्ये चार जण भाजले, तर त्याच दिवशी आठ जणांचा एसएमएस हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

https://www.ndtv.com/india-news/death-count-rises-to-18-in-jaipur-tanker-blast-accident-7329959#:~:text=The%20accident%20occurred%20near%20Bhankrota ,%20%20%20 ???जयपुरिया%20हॉस्पिटलमध्ये नोंदवले गेले. ???

या अपघातातील मृतांची संख्या आता १८ झाली आहे.

https://www.indiatoday.in/india/story/rajasthan-jaipur-ajmer-highway-lpg-tanker-blast-dead-injured-2655298-2024-12-25

लाइटहाऊस जर्नलिझमने राजस्थानमधील ज्येष्ठ पत्रकार आनंद त्रिपाठी यांच्याशीही संपर्क साधला, त्यांनी व्हिडीओ जयपूर दुर्घटनेशी संबंधित नसल्याचे स्पष्ट केले.

निष्कर्ष :

जुना असंबंधित व्हिडीओ नुकताच जयपूर हायवेवर झालेल्या एलपीजी टँकरच्या स्फोटात होरपळलेल्या लोकांचा असल्याचा दावा करून व्हायरल केला जात आहे. व्हायरल केलेला दावा दिशाभूल करणारा आहे, कारण व्हायरल व्हिडीओ हा राजस्थानच्या बुंदीच्या बरोडिया गावात दिवाळीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीचा आहे.

Story img Loader