Tina Dabi Pregnant : जैसलमेरच्या बहुचर्चित IAS अधिकारी टीना डाबी या लवकरच आई होणार आहेत. त्या गरोदर असल्याने त्यांनी सुट्टीसाठी अर्ज केला आहे. सप्टेंबर महिन्यात त्या बाळाला जन्म देतील. टीना डाबी या IAS ऑफिसर कायमच चर्चेत असतात. त्यांच्या चाहत्यांसाठी त्यांनी आता ही गुड न्यूज दिली आहे. सध्या त्यांनी जयपूरमध्ये नॉन फिल्ड पोस्टिंग दिलं जावं अशी विनंती केली आहे. तसंच लवकरच टीना डाबी मातृत्वाच्या रजेवर (maternity leave) जाणार आहेत.
मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात प्रदीप गावंडे यांच्याशी लग्न केल्यानंतर टीना डाबी या चर्चेत आल्या होत्या. तसंच गेल्या महिन्यातही टीना डाबी चर्चेत होत्या. पाकिस्तानातून निर्वासित झालेल्यांची घरं त्यांनी पाडली, त्यानंतर त्यांना घरांसाठी वेगळी जागा उपलब्ध करुन दिली. या घटनेनंतर टीना डाबी यांना काही ज्येष्ठ महिलांनी दुवा देत तुला मुलगा होईल पोरी असा आशीर्वाद दिला होता. त्यावेळी त्या गरोदर असल्याची बाब समोर आली होती. मुलगा झाला काय किंवा मुलगी झाली काय माझ्यासाठी दोन्ही सारखंच आहे असं टीना डाबी यांनी म्हटलं आहे.
टीना डाबी यांनी केला रजेचा अर्ज
जिल्हाधिकारी टीना डाबी यांनी गरोदर असल्याने राजस्थान सरकारला पत्र लिहिलं आहे. जयपूरमध्ये नॉन फिल्ड पोस्टिंग मिळावं असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच लवकरच त्या मॅटर्निटी लिव्हवर जाणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये बदल्यांची यादी येणार आहे. या यादीत त्यांचं नाव असू शकतं त्या अनुषंगानेच त्यांनी ही विनंती केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी टीना डाबी यांनी जैसलमेरहून जयपूरला जाण्यासाठी तयारी केली आहे. त्यांनी आपल्या घरातलं बरचसं सामान जयपूरला पाठवलं आहे. एक-दोन दिवसात त्यांची बदली होईल अशी अपेक्षा त्यांना आहे. सध्या टीना डाबी महत्त्वाच्या मिटिंग्जना उपस्थिती लावत आहेत. जैसलमेरच्या जिल्हाधिकारी म्हणून टीना डाबी यांनी उत्तम काम केलं आहे. आता त्या त्यांच्या प्रेग्नंसीमुळे चर्चेत आल्या आहेत.