Shocking video: सोशल मीडियावर रोज वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये काही व्हिडीओ पाहून हसू येते तर काही व्हिडीओ पाहून धक्का बसतो. अशीच एक पंजाबमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. येथील एका लग्न समारंभात उत्साहाच्या भरात झालेल्या गोळीबारात ४५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. पंजाबच्या जालंदरमध्ये लग्नसमारंभात ही धक्कादायक घटना घडली आहे.लग्न समारंभात झालेल्या गोळीबारात परमजीत सिंग नावाच्या ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. विवाहपूर्व पारंपारिक कार्यक्रम “जागो पार्टी” दरम्यान ही घटना घडली. तरुणाच्या मृत्यूचा हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये असे दिसतेय की, सोहळ्यादरम्यान एक तरुण जात आहे. त्याचवेळी दुसरा तरुण गोळी झाडतो. ती गोळी त्या तरुणाला लागते आणि तो जमिनीवर कोसळतो. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये लग्नाच्या समारंभात एका व्यक्तीने हवेत गोळी झाडताना दिसत आहे. बंदूक चालवणारा माणूस चुकून त्या व्यक्तीच्या खूप जवळ गेला, त्यावेळी त्याच्या बंदुकीतून चुकून गोळी झाडली जातो.त्या व्यक्तीने एकूण तीन गोळ्या झाडल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. परंतु मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला असा दावा केला की, की त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. तसेच मृत्यूची वास्तविक स्थिती पोलिसांना न सांगताच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. हा सगळा प्रकार पाहून पोलिसही चक्रावले आहेत.

व्हायरल व्हिडीओने सत्य उघड केले आहे

शनिवारी (२२ फेब्रुवारी) या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सत्य समोर आले. पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला असून व्हिडिओमध्ये गोळीबार करताना दिसणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे.पोलिसांनी तपास सुरू केला असून कुटुंबीयांचे जबाब घेत आहेत. त्यांच्याकडून गोळीबारात वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात येणार आहे.परमजीत सिंगचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा कुटुंबीयांनी सुरुवातीला दावा केला होता, मात्र व्हिडिओमध्ये अपघाती गोळीबार झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान वरिष्ठ पोलीस अधीक्षक हरकमलप्रीत सिंग खख यांनी सांगितले की, मृत्यूचे नेमके कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा तरुणाचा मृत्यू कसा झाला.

पाहा व्हिडीओ

काही दिवसांपूर्वी नोएडा येथे घडलेल्या दुसऱ्या घटनेत, लग्नाच्या मिरवणुकीत उत्सवाच्या वेळी झालेल्या गोळीबारात डोक्यात गोळी लागल्याने एका अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावर आता नेटकरीही प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “स्पष्ट दिसतंय मुद्दाम केलंय सगळं”, तर आणखी एकानं “गोळी लागली की मुद्दाम मारली हे व्हिडीओमध्ये दिसत आहे त्यामुळे पोलिसांनाही कळेल.” अशी प्रतिक्रिया दिलीय.

Story img Loader