इन्स्टाग्राम इन्फ्लुअन्सर तरुणीला पोलीस वाहनाचा वापर करू दिल्याने संबंधित पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. तरुणीने गाडीच्या बोनेटवर बसून अश्लील हावभाव केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली. पंजाबमधील जालंधर येथे ही घटना घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या काही दिवसांत इन्स्टाग्राममुळे इन्फ्लुअन्सर्सची संख्या वाढली आहे. अनेकजण विविध कलेच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवरून व्यक्त होत असतात. तर काही इन्फ्लुअन्सर्स समाजात चुकीचे संदेशही पसरवतात. असाच प्रकार पंजाबच्या जालंधर येथे घडला आहे. एका तरुण इन्स्टाग्राम इन्फ्लुअन्सरने पोलिसांच्या वाहनात बसून रील शूट केले. या रीलमध्ये तिने अश्लिल आणि विचित्र हावभाव केले आहेत. तसंच, ती गाडीच्या बोनेटवरही बसली. धक्कादायक म्हणजे, पोलीस अधिकाऱ्यानेच तिला पोलीस वाहनाचा वापर करण्याची परवानगी दिली होती.

तिचा हा रील सोशल मीडियावर व्हायरल होताच जालंधरचे पोलीस आयुक्त कुलदीप चहल यांनी अशोक शर्मा या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई केली. सोशल मीडियासाठी रिल्स बनवण्याकरता मुलीला पोलिसांच्या अधिकृत वाहनाचा वापर करू दिल्याबद्दल संबंधित पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं.

ऑगस्टमध्येही पंजाबमध्ये असा प्रकार घडला होता. एका इन्फ्लुअन्सरने थारवर बसून होशियारपूरमधील राष्ट्रीय महामार्गावर फेरफटका मारून तिचे दहा लाख फॉलोवर्सचे यश सेलिब्रेट केले होते. याप्रकरणीही पोलिसांचं निलंबन करण्यात आलं होतं.