Viral video: सोशल मीडियावर सतत आपल्याला नवनवे व्हिडिओ पाहायला मिळतात. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. यात अनेक व्हिडिओ मजेशीर असतात. मात्र काही व्हिडिओ असे असतात जे पाहून काळजाचा ठोका चुकतो. हे व्हिडिओ अनेकदा धडकी भरवणारे आणि विचार करण्यास भाग पाडणारे असतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. बैलगाडी स्पर्धा, जल्लीकट्टू हा विषय अनेकदा सुरक्षेच्या दृष्टीनं वादाचा ठरला आहे. दरम्यान अशीच एक घटना आता समोर आली आहे. यामध्ये प्रेक्षकांच्या आरडाओरडीमुळे बैल बिथरला आणि थेट प्रेक्षकांमध्ये शिरल्यानं अपघात झाला आहे. याचा व्हिडीओही सध्या व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही बैलगाडा शर्यत नसून जल्लीकट्टूचा खेळ आहे. पाळीव प्राणी असले तरी ते चवताळले तर त्यांच्यासमोर कुणाचाच टिकाव लागू शकत नाही. त्यामुळे अशा प्राण्यांशी खेळ म्हणजे जीव धोक्यात घालणंच आहे. अशाच बैलानं मैदानातून थेट प्रेक्षकांवरच उडी मारली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक बैल मैदानात आहे. स्पर्धदरम्यान तो खवळला आहे. इथून तिथून पळतो आहे. प्रेक्षकांवर झडप घेण्याचा प्रयत्न करतो आहे. बैल वेगाने धावत सगळ्या माणसांमध्ये शिरतो. यामध्ये नागरिकांची मोठी धांदळ उडते. सर्वजण सैरभैर धावू लागतात. या धावपळीत बैलाच्या पायाखाली देखील काही व्यक्ती येतात. अनेकांना यामध्ये इजा होते. यानंतर या बैलाला नियंत्रणात आणण्यात आलं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> तरुणीला प्रपोज करायला गेला अन् निबार मार खाल्ला; नेमकं काय झालं? VIDEO एकदा पाहाच
जल्लीकट्टू हा जमावामध्ये बैलाला नियंत्रित करण्याचा खेळ आहे.जल्लीकट्टूच्या खेळात खेळाडूंना मोकळ्या सोडलेल्या बैलावर नियंत्रण ठेवावे लागते. जल्लीकट्टूला एरु थाझुवुथल आणि मनकुविरट्टू असेही म्हणतात. हा खेळ पोंगल सणाचा एक भाग आहे. यात बैलाला गर्दीत सोडले जाते आणि खेळाडू त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतात.
इंस्टाग्रामवर Jallikattu नावाच्या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरती हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.