Viral Video : लालपरी म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी बस चालकाचे व्हिडीओ तर कधी बस कंडक्टरचे व्हिडीओ व्हायरल होतात. कधी बसमधील किस्से सुद्धा व्हायरल होतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सध्या असाच एक आगळा वेगळा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुंदर लालपरी सजवलेली दिसत आहे.चालकाने स्वखर्चातून ही लालपरी सजवली आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (jalna Driver decorated Lalpari bus in his own expenditure a beautiful decorative st bus video viral)
चालकाने स्वखर्चातून सजवली लालपरी!
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक लालपरी दिसेल. ही लालपरी आतुन सुंदररित्या सजवली आहे. लालपरीच्या पुढील काचांवर सजावट केली आहे. आकर्षक दिसण्यासाठी हिरवे गवत लावले आहे. टेडी, हॉर्ट लावले आहेत. बसमध्ये स्वामी समर्थ यांची प्रतिमा आहे. सजावट पाहून तुम्हाला वाटणार नाही की ही लालपरी आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. जालना येथील माणगाव माजलगाव येथील ही गाडी आहे. चालकाने स्वखर्चातून ही गाडी सजवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालक विकी भोसले यांनी ही गाडी सजवलेली आहे.
हेही वाचा : VIDEO: काय बोलावं आता! पोलिसांचा चक्क डेप्युटी कलेक्टरवरच लाठीचार्ज; साहेब संतापले अन् पुढं काय झालं पाहाच
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
ganesh_shinde_mh21 या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आम्ही_जालनाकर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हा चालक १०० टक्के ट्रक ड्रायव्हर असेल आधी” तर एका युजरने लिहिलेय, “खरंच अशा चालकाला माझे मनापासून अभिनंदन.”
आणखी एका युजरने लिहिलेय, “ज्यांनी ही गाडी सजवलेली आहे ती त्यांनाच चालवायला द्यायला पाहिजे ..” एक युजर लिहितो, “नाद महत्वाचा आहे. वाहन जरी महामंडळाचे असेल पण त्यांची रोजी रोटी आहे ती.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी या चालकाचे कौतुक केले आहेत. अनेक युजर्सनी एसटी ड्रायव्हरविषयी सहानभूती व्यक्त केली. काही युजर्सनी तीन चालकांना एक एसटी द्यावी, अशी मागणी सुद्धा केली. अनेक एसटी चालक रील्स व्हिडीओ सुद्धा बनवतात. त्यांच्या व्हिडीओवर लोक कौतुकाचा वर्षाव करतात.