Army Jawans Celebrate Diwali at Border: देशभरात सर्वच ठिकाणी नागरिक आपल्या गावी जाऊन, कुटुंबीसमेवत दिवाळीचा आनंद घेण्यास तयार आहे. तर दुसरीकडे सीमेवरील भारताचे वीर जवान आपल्या देशवासीयांना आनंदात सण-उत्सव साजरे करता यावेत म्हणून आपल्या कुटुंबापासून दूर राहून देशाचे रक्षण करत आहेत. याचबरोबर हे जवान आपल्या कर्तव्याच्या ठिकाणीच म्हणजेच सीमेवरच आपल्या सहकाऱ्यांसमवेत दिवाळीही साजरी करत आहेत. याशिवाय या जवानांनी देशवासीयांना, अभिमानास्पद संदेशही दिला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या जवानांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.
जवान आपल्या संदेशात म्हणाले, “अरे बेटा, या दिवाळीत तरी घरी ये. तू तुझ्या बहिणीच्या लग्नालाही आला नाहीस. आम्ही आमच्या मातृभूमीची सेवा करतोय आणि सीमेवर गोळीबार करणे म्हणजे आमच्यासाठी रोज दिवाळी साजरी करण्यासारखे आहे.” “हे गाणे केवळ लष्करातील जवानांच्या भावनाच दर्शवत नाही, तर ते आपल्या कुटुंबापासून दूर राहूनही देशाचे रक्षण करण्यासाठी कसे तयार असतात हे देखील सांगते. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून देशवासियांच्या हृदयाला भिडत आहे. आपले सैनिक कर्तव्य बजावत असताना आपल्या कुटुंबाच्या आठवणी कशा जपतात हे यातून दिसून येते.
देशभरात सध्या दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. देशवासीयांना हा आनंद सुरक्षित वातावरणात साजरा करता यावा म्हणून हजारो जवान स्वत:च्या कुटुंबापासून दूर राहून जम्मू-काश्मीरच्या सीमेवर पहारा देत आहेत. या जवानांनी दिवाळी साजरी केली आहे. सीमेवर जवानांनी दीप प्रज्ज्वलित केले. फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना मिठाई वाटली. नेहमीचा तणाव विसरून नृत्यही केले. सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारामुळं येथील गावांमध्ये कायम तणावाचं वातावरण असतं. जवानांनी दिवाळी साजरी करून येथील नागरिकांना एकप्रकारे धीर दिला आहे. ‘तुम्ही उत्साहात दिवाळी साजरी करा, शत्रूला उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आहोत’ असा संदेशच जणू त्यांनी दिला.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Gold Price: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सोन्याचे भाव कमी झाले का? गुगलवरही ट्रेंड होणारा सोन्याचा आजचा भाव पाहा
जवानांच्या परिश्रम आणि बलिदानाला देशवासीय सलाम करत आहेत. ही दिवाळी, जेव्हा लोक आपल्या कुटुंबासोबत साजरी करत असतील, तेव्हा हे गाणे आपल्याला आठवण करून देते की आपले सैनिक आपल्या कुटुंबापासून दूर राहून आपल्यासाठी देशाचे रक्षण कसे करत आहेत.