Jammu Woman Speaks Fluent Kannada In Bengaluru : काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात मराठी भाषेवरून वाद पेटल्याच्या घटना घडल्या होत्या. महाराष्ट्रातील एअरटेल ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये मराठी भाषेवरून वाद झाला. त्यानंतर एका बँक कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये मराठी भाषा बोलण्यावरून वाद झाल होता. त्यानंतर डीमार्टमध्ये दोन ग्राहकांमध्ये मराठीत बोलण्यावरून वाद झाला होता. या घडनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. स्थलांतरित लोकांनी त्या राज्याच्या भाषेत बोलावे असा हट्ट स्थानिक लोक करतात. हा वाद फक्त महाराष्ट्रातच नाही इतर राज्यांमध्येही होत असतो. मराठी असो की कन्नड भाषेवरून वाद घालण्यासाठी अनेक जण समोर येतात.

मातृभाषेबद्दल प्रेम वाटणे हे साहाजिक आहे आणि ते सर्वजण करतात. पण इतर भाषेवर मातृभाषेप्रमाणे प्रेम करणारे फार मोजके लोक असतात. अशाच एका तरुणीचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. बंगळुरूच्या रस्त्यावरून फिरणारी काश्मिरी तरुणी फाड फाड कन्नड भाषेत बोलत आहे आणि कन्नड भाषा शिकण्याचा आग्रही करत आहे. या तरुणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

फाडफाड कन्नड बोलणारी काश्मिरी तरुणी (A Kashmiri girl who speaks fluent Kannada)

बंगळुरमध्ये एक तरुण रस्त्यावरून जाणाऱ्या एका जम्मु-काश्मिरी तरुणीची घेतो आणि तिला प्रश्न विचारतो की, बंगळुरूमधील लोकसंख्या कोणत्या राज्यामुळे वाढत आहे. त्यावर ती बिहार असे उत्तर देते. पुढे ती फाड फाड कन्नड भाषेत बोलण्यास सुरु करते. हे पाहून सर्वांनाच सुखद धक्का बसतो. दरम्यान या तरुणीच्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये तिचे कन्नड भाषेवरील प्रभुत्व आणि प्रेम दिसून येते. या व्हिडीओमुळे स्थानिक नसलेल्या लोकांनी कन्नड भाषा शिकावी की नाही या सततच्या चर्चेला पुन्हा उधान आले आहे.

कन्नड शिकण्याचा केला आग्रह (Insisted on learning Kannada)

उत्तर प्रदेश, नेपाळ आणि बिहारमधून नोकरीसाठी बंगळुरूमध्ये स्थलांतरीत होणाऱ्या लोकांना उद्देशून ती म्हणते, “जर तुम्ही कर्नाटकात येत असाल तर किमान तुम्ही स्थानिक भाषा शिकू शकता. हे अगदी सामान्य आहे. कन्नड भाषेत अस्खलितपणे बोलताना ती मुलगी म्हणाली, “इथे इतके लोक बाहेरून येतात की कर्नाटकातील लोकांकडे आता जागाच नाही आणि त्याहूनही वर, ते आम्हाला हिंदीत बोलण्याची मागणी करतात. ते कन्नड का शिकू शकत नाहीत?”

तिच्या कन्नड भाषेने प्रभावित झालेल्या होस्टने तिला उत्तर दिले, “तू आताच तुझा मुकुट खाली टाकलास ( तु सर्वांचे मन जिंकले आहेस या उद्देशाने म्हणतो),” हे ऐकताच ती तरुणी हसत होती.

नेटकऱ्यांनी केल तोंडभरून कौतुक (Netizens praised the move)

व्हिडिओने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया शेअर केल्या. अनेक वापरकर्त्यांनी कन्नड भाषा चांगल्या पद्धतीने बोलल्याबद्दल तिचे कौतुक केले आणि लिहिले, “शानदार.” त्यापैकी एकाने शेअर केले, “वाह, खरोखरच छान बोललीस, सुंदरी. ती नवीन कर्नाटक क्रश आहे.” दुसऱ्याने शेअर केले, “जर तुम्हाला वाटत असेल तर कन्नड शिका. जर तुम्हाला केएमध्ये दीर्घकाळ आवडायचे असेल तर ते करणे व्यावहारिकदृष्ट्या अर्थपूर्ण आहे.”

एका व्यक्तीने लिहिले, “बाहेरील लोक ज्यांना वर्षानुवर्षे इथे राहूनही कन्नड भाषा येत नाही, त्यांनी तिच्याकडून शिकले पाहिजे. मोफत ऑनलाइन संसाधनांसह शिक्षित आयटी उद्योगातील कर्मचारी आणि तुम्ही अजूनही कन्नड शिकण्याचा प्रयत्न करत नाही.”

काही वापरकर्त्यांनी व्हिडिओला विरोध करत म्हटले, “भाऊ, हे दिशाभूल करणारे व्हिडिओ बनवू नका, आम्ही तुमच्या भाषेचा आदर करतो पण तुमचा वैयक्तिक अहंकार पूर्ण करण्यासाठी कोणीही नवीन भाषा शिकण्याची डोकेदुखी सहन करणार नाही.”

दुसऱ्याने शेअर केले, “भारत आणि त्याचे राज्य ज्या पद्धतीने प्रगती करत आहे ते मूर्खपणाचे आहे.”