आपल्या देशात पोलीस दलामध्ये सर्वात जास्त चर्चा कोणाची होत असेल तर ते म्हणजे मुंबई पोलीस. एखाद्या गुन्ह्याची उकल करण्यापासून ते शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापर्यंत मुंबई पोलीस आपली जबाबदारी चोखपणे पार पाडतात. या बाबतीत मुंबई पोलिसांचा हात कोणीही धरू शकत नाही. बरं मुंबई पोलीस फक्त एवढ्याच कामात तरबेज आहेत असे नाही. तर या पोलिसांच्या बँड पथकाचीदेखील संपूर्ण भारतामध्ये चर्चा होत असते. सध्या याच बँडचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. सगळीकडे दहीहंडीचा माहौल रंगलाय. अशात गोविंदा पथकांबरोबरंच मुंबई पोलिसांवरही ढाकुम्माकुमची भुरळ पडली आहे. या व्हिडीओमध्ये मुंबई पोलिसांच्या बँडने ‘मच गया शोर सारी नगरी रे’ हे भन्नाट गाणं सादर केलं आहे.
बई पोलिसांच्या बँडची सगळीकडे चर्चा होत असते. सध्या या बँड पथकाने राज्यभरात्या दहीहंडीचा उत्साह वाढवलाय. मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये मुंबई पोलिसांच्या खाकी वर्दीतील बँड सदस्य खुर्च्यांवर बसलेले, बासरी, ट्रम्पेट आणि इतर वाद्ये हिंदी गाण्याच्या सुरात वाजवताना दिसत आहेत. यात त्यांनी दहीहंडीच्या निमित्ताने ‘खुद्दर’ या बॉलिवूड चित्रपटातील ‘मच गया शोर सारी नगरी रे’ या लोकप्रिय गाण्याची धून वाजवून त्यांनी महाराष्ट्रातील तसेच संपूर्ण देशवासीयांची मने जिंकली.
आणखी वाचा : १५ ऑगस्टच्या दिवशी पोलीस स्टेशनमध्येच पोलिसांचा नागीण डान्स, पाहा हा VIRAL VIDEO
मुंबई पोलिसांचा एक भन्नाट व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडवून दिली असून, युजर्स मुंबई पोलिसांच्या अधिकृत बँडचे कौतुक करत आहेत. “मुंबई पोलीस खाकी स्टुडिओमध्ये कृष्ण जन्माष्टमी २०२२ साजरी होत असताना अमिताभ बच्चन यांचा मज गया शोर.” हा व्हिडीओ व्हायरल होताच युजर्स मात्र स्वत: ला रोखू शकले नाहीत आणि कमेंट सेक्शनमध्ये कौतुकाचा अक्षरशः महापूर आला आहे. एका युजरने लिहिले की, “फांटस्टिक”.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : पाकिस्तानींनी ‘चप्पल मार मशीन’चा लावला शोध, लोक म्हणाले, “अप्रतिम ऑटोमेशन!”, कमेंट्सचा महापूर!
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : एका तुटलेल्या पुलावरून पठ्ठ्यानं केली रॉयल एनफिल्डची स्वारी, VIRAL VIDEO पाहून तुमचा विश्वास बसणार नाही
बँडने त्यांचं टॅलंट दाखवण्याची आणि प्रशंसा मिळवण्याची ही पहिलीच वेळ नाही. खाकी स्टुडीओ प्रत्येक खास प्रसंगी आपल्या कामगिरीने लोकांची मने जिंकतो. या वर्षाच्या सुरुवातीला, बँडने अल्लू अर्जुनच्या पुष्पा: द राइजमधील श्रीवल्ली हे गाणे वाजवले. मुंबई पोलिसांनी यंदाच्या दहीहंडीच्या निमित्ताने लोकांना ही अनोखी भेट दिली आहे.