‘This January is Januaring like no January ever Januaried’ हे वाक्य सध्या तुम्हाला सोशल मीडियावर अनेक फोटो किंवा विनोदी व्हिडीओ, मीम्समधून पाहायला मिळत असेल. कारण- नवीन वर्ष सुरू होऊन २६ दिवस लोटले असले तरीही तो काळ जवळपास प्रत्येकालाच खूप मोठा वाटत आहे. नवीन वर्षाचा पहिलाच महिना इतका रटाळ आणि कंटाळवाणा वाटत असल्याने सोशल मीडियावर त्याबद्दल तुफान चर्चा होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता ३१ दिवस हे केवळ जानेवारीमध्ये नसून इतरही काही महिन्यांमध्ये असतात. असे असले तरीही हा महिना मात्र अगदी कासवाच्या गतीने पुढे सरकतो आहे. येणारा प्रत्येक दिवस सुरू तर होत आहे; मात्र संपायचे नाव घेत नाही, अशी भावना अनेकांच्या मनात असल्याचे सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या विविध पोस्टमधून समजते आहे. नेटकऱ्यांनी वेगवेगळे विनोदी फोटो शेअर करून, त्यावर “नवीन वर्षाचे तीन महिने संपले, तरीही आपण अजून जानेवारीमध्ये अडकलो आहेत!” “अजूनही ९ दिवस उरलेत हा महिना संपायला? कसं शक्य आहे हे?” “This January is Januaring like no January ever Januaried” अशा पद्धतीचे कॅप्शन लिहिलेले आपण पाहायला मिळतेय.

हेही वाचा : Fact check : मुंबई येथील मीरारोडचा व्हायरल होणारा ‘तो’ व्हिडीओ खरा की खोटा? काय आहे सत्य जाणून घ्या

नेटकऱ्यांनी सोशल मिडियावर शेअर केलेल्या काही पोस्ट पाहा :

नेमका जानेवारी २०२४ हा महिना इतका मोठा का वाटत आहे? कुणीतरी स्पेस-टाइमसोबत छेडछाड केली आहे का? आपल्याबरोबर मस्करी करण्यासाठी पृथ्वीने तिच्या परिभ्रमणात बदल तर नाही ना केला? असे विविध चित्र-विचित्र प्रश्न अनेकांच्या मनात उभे राहिले आहेत. मात्र, याबद्दलचे थोडक्यात स्पष्टीकरण किंवा अंदाज एका झेंगुआंग कै नामक पीएच.डी.च्या विद्यार्थ्याने सांगितला असल्याची माहिती न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखावरून मिळाली आहे.

त्या लेखानुसार “डिसेंबर महिन्यात नाताळची सुट्टी असते. आता इतक्या मोठ्या सुटीनंतर पुन्हा कामाला सुरुवात करायची म्हटल्यावर अनेकांना आपसूकच कंटाळा किंवा आळस येतो. परिणामी जानेवारी हा मोठा आणि रेंगाळत चालणारा महिना वाटण्याची शक्यता असते,” अशी माहिती झेंगुआंग कै [Zhenguang Cai] या ULC मध्ये वेळेच्या आकलनाचा [specializing in time perception] अभ्यास करणाऱ्या एका पीएच.डी. विद्यार्थ्याने दिली आहे, असे समजते.

हेही वाचा : खाली खोल दरी अन् दोरीच्या मदतीने गड चढतोय चिमुकला! पाहा, अंगावर काटा आणणारा धाडसी Video

काही प्रदेशांमध्ये जानेवारी महिन्यात हवा अत्यंत थंडी, कोरडी आणि कमी सूर्यप्रकाश देणारी असते. असे वातावरण सहज एखाद्याला कंटाळवाणे वाटू शकते. त्यालाच सीझनल इफेक्टिव्ह डिसऑर्डर [Seasonal affective disorder (SAD)], असेही म्हटले जाते, अशी माहिती न्यूज १८ डॉट कॉमच्या एका लेखावरून मिळाली. या प्रकारात व्यक्तीच्या मूड, भावनांवर हवामानाचा परिणाम होत असतो, असे म्हणतात.

अशा स्वरूपाचे विविध तर्क जानेवारी इतका मोठा महिना का वाटतो आहे याबद्दल लावले जाऊ शकतात, असे समजते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: January feels like a never ending month of 2024 says netizens do you feel the same then check out the reason dha
Show comments