जपानचे राजदूत हिरोशी सुजुकी हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत दरम्यान त्यांनी विविध भारतीय पदार्थांचा मनसोक्त आनंद घेतला आहे. तसेच त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. जपानचे राजदूत हिरोशी सुजुकी यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते वडापाचा आनंद घेताना दिसले. थोडं कमी तिखट प्लिज असे म्हणत त्यांनी वडापाववर ताव मारला आहे. हा व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे जो लोकांना फार आवडत आहे. दरम्यान त्यांच्या एका व्हिडिओवर पंतप्रधान मोदी यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोक त्यांना वेगवेगळे पदार्थ खाण्याचा सल्ला देत आहे.
जपानचे राजदूत सुजुरी भारत प्रवासात आनंदी असल्याचे दिसत आहे. कधी त्यांना १०० रुपयांची टीशर्ट आवडतो तर कधी मुंबईच्या लोकल ट्रेनचा प्रवास. काही दिवसांपूर्वीच त्यांनी बनारसचा लिट्टी चोखा आणि पाणीपुरी खाताना व्हिडिओ पोस्ट केला होता जो लोकांना प्रचंड आवडला आणि त्यावर भरभरून प्रतिक्रिया देखील मिळाल्या.
जपानचे राजदूत हिरोशी सुजुकी यांनी लिहले की, आम्हाला वडापाव मिळाला…
खरं तर जपानच्या राजदूत हिरोशी यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते वडापाव कशा प्रकारे खात आहे हे दिसते. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहले की, आम्हाला वडापाव मिळाल. या व्हिडिओ कॅप्शमध्ये त्यांनी असेही लिहिले की मला भारतीय स्ट्रीट फूड खूप आवडले पण ते जरा कमी तिखट असले पाहिजे.
जेव्हा ते वडापाव खात होते तेव्हा कोणीतरी त्यांना तळलेली मिर्ची खायला देण्याचा प्रयत्न करत आहे. पण ते म्हणतात की नको, मिर्ची तिखट आहे. या व्हिडिओमध्ये ते आनंदाने वडापाव खात आहेत.
लोकांना त्यांचा हा अंदाज खूप आवडला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत साडे तीन लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. साधारण सात हजार लाइक्स मिळाले आहे. एवढंच नव्हे तर या व्हिडिओला आतापर्यंत ५०९ लोकांनी रिट्विट केले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक प्रतिक्रिया देत आहे की, खूप मस्त सर! तुम्हाला वडापाव खाऊन आनंद होत आहे आणि कित्येक लोक त्यांनी इतर भारतीय पदार्थ खाण्याचा सल्ला देत आहे.
सुझुकी यांनी खाल्ली पुण्याची मिसळ
दरम्यान, जपान राजदूत सुझुकी यांनी पुण्यातील रस्त्यांवर त्यांच्या भारतीय प्रवासाबाबत आणखी एक ट्विट केले होते ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीसह वडा पाव आणि मिसळ पावचा खाण्याचा आनंद घेतल्याचे दिसत आहे. त्यांच्या या ट्विटने खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधले.
हेही वाचा – शोधाल तर सापडेल! ‘या’ फोटोत लपलंय एक लबाड मांजर, समोर असूनही दिसणार नाही, १० सेंकदाचं चॅलेज घ्या
हेही वाचा – गोबऱ्या गालांवरून नवऱ्याची बोलणी ऐकून महिलेने सोडले खाणे-पिणे, ‘अशी’ झाली अवस्था, २२ किलो झाले वजन
पीम मोदींनी केले ट्विट
पीएम मोदी ट्विटमध्ये म्हणाले की, “ही एक स्पर्धा आहे जी तुम्हाला हरायला हरकत नाही, मि. राजदूत. तुम्हाला भारतातील खाद्य संस्कृतीतील विविधतेचा आनंद घेताना आणि ते अशा नाविन्यपूर्ण पद्धतीने सादर करताना पाहून आनंद झाला. व्हिडिओ पोस्ट करत राहा!
दोन्ही व्हिडिओला लोकांच्या भरभरून प्रतिसाद मिळत आहे. लोक सुजुकी याना विविध भारतीय पदार्थ खाण्याचा सल्ला देत आहेत