वॉशरूमधील कमोड वापरल्यानंतर फ्लशने भरपूर प्रमाणात पाणी सोडल्या जाते. या पार्श्वभूमीवर पाण्याची बचत व्हावी यासाठी जपानमध्ये एक इकोफ्रेंडली टॉयलेट बनवण्यात आले आहे. त्याच्या अनोख्या वैशिष्ट्यांमुळे संपूर्ण जगात त्याची चर्चा सुरू आहे.
हे जपानी टॉयलेट दर वर्षी लाखो लिटर पाण्याची बचत करत असल्याचा दावा करण्यात आला आहे. टॉयलेट पर्यावरणपुरक असून त्याच्या डिझाईनमुळे वॉशरूमधील जागा वाचते, असा देखील दावा करण्यात आला आहे. @fasc1nate नावाच्या ट्विटर हँडलवरून या जपानी टॉयलेटचा फोटो टाकण्यात आला आहे.
(Viral : बुटात आढळला नाग, काठीने हलवताच चवताळला, पाहा हा थरारक व्हिडिओ)
काय आहे वैशिष्ट्ये?
फोटोमधील जपानी टॉयलेटला सिंक जोडण्यात आले आहे. हात धुतल्यानंतर जे पाणी जमा होते ते फ्लशसाठी वापरले जाते. याने जपानमध्ये दरवर्षी लाखो लिटर पाण्याची बचत होते, असा दावा फोटो शेअर करणाऱ्या युजरने केला आहे. फोटोमध्ये एक कमोड असून त्याच्यावर सिंक लावण्यात आल्याचे दिसून येत आहे.
जपानमधील हे टॉयलेट पर्यावरणाला फायदेशीर ठरू शकते. एव्हाना फ्लश करताना भरपूर पाण्याचा वापर होतो. पण या पद्धतीने जर पाण्याचा पुन्हा वापर करता आला तर पाण्याची बचत करता येईल. उन्हाळ्यात दुष्काळाची समस्या निर्माण होते. अशात पाण्याची बचत करणे गरजेचे आहे. अशावेळी हे टॉयलेट फायदेशीर ठरू शकते.