तुम्ही पारंपरिक पोशाख घाला किंवा वेस्टर्न ‘घड्याळ’ हा उत्तम पर्याय असतो ; जो तुम्हाला परफेक्ट लूक देण्यास मदत करतो. पण, अनेकदा असं होत की, फुल हॅन्ड कुर्ता किंवा फुल स्लीव्स ब्लाउजच्या पॅटर्नमुळे घड्याळ घालता येत नाही आणि घातलचं तरी मग ते मनगटावरून थोडं मागे सरकवून घड्याळातील वेळ पाहावी लागते. पण, जपान देश याबाबतीत खुपचं प्रगत झालेला दिसतो आहे.
थोडा नवीन टच देऊन डिझायनरने एक जॅकेट बाजारात आणलं आहे. एका एक्स (ट्विटर) युजरने जपानी जॅकेटचा एक फोटो शेअर केला आहे. या जॅकेटमध्ये एक घड्याळ जोडलं आहे. जॅकेटवरील नावावर गोरे-टेक्स या स्पोर्ट्सवेअर कंपनीच्या लोगोचा उल्लेख आहे ; जो वॉटरप्रूफ फॅब्रिकसाठी ओळखला जातो. तर या जॅकेटची खासियत अशी आहे की, तुम्हाला घड्याळातील वेळ पाहण्यासाठी मनगटावरील कपडे सरकावण्याची गरज भासणार नाही. तुम्हीसुद्धा पाहा हे अनोखं जॅकेट.
पोस्ट नक्की बघा…
तुम्ही पोस्टमध्ये पाहिलं असेल की, तुमच्या शर्टाला जसा एक खिसा दिलेला असतो. अगदी त्याचप्रमाणे या जॅकेटवर एक कप्प्यासारखं दिसणारा पार्ट आहे. त्यामध्ये एक घड्याळ फिट (Fit) केलं आहे. या सोप्या पण, प्रभावी डिझाइनचा अर्थ असा आहे की, स्मार्टवॉच वापरकर्त्यांना आता प्रत्येक वेळी वेळ पाहण्यासाठी त्यांच्या मनगटावरील परिधान केलेलं कपडे सरकावण्याची गरज भासणार नाही व हे जॅकेट वॉटरप्रूफ देखील आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट @Spshulem या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. पोस्ट पाहून नेटकरी या व्यक्तीची ही ‘कामगिरी’ पाहून सलाम करीत आहेत व व्यक्तीच्या या नावीन्यपूर्ण दृष्टिकोनाला कमेंटमध्ये दाद देताना दिसत आहेत. जपान त्याच्या नाविन्यपूर्ण छोट्या-छोट्या तांत्रिक प्रगतीसाठीच नव्हे तर दररोजच्या छोट्या-छोट्या शोधांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे ;ज्याचं आणखीन एक उदाहरण आज आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे.