प्रेमापेक्षा जगात दुसरी कोणतीच गोष्ट महत्त्वाची नसते आणि प्रेम हे कधी माणसांचा पैसा, थाटमाट पाहून करायचं नसतं हे साऱ्या जगाला दाखवून देणाऱ्या जपानच्या राजकन्येनी आपल्या साखरपुड्याची आणि विवाहाची घोषणा केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२५ वर्षांची राजकुमारी माको ही काही महिन्यांपूर्वी चर्चेत आली होती. माकोने इथल्या एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याशी विवाह करण्याचा निर्णय घेऊन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. माकोचा होणारा पती केई कोमूरो हॉटेलमध्ये सागरी पर्यटन विभागात काम करतो. पाच वर्षांपूर्वी राजकुमारी माको त्याला भेटली होती आणि त्याचक्षणी त्याच्या प्रेमात पडली. हे दोघेही टोकियोतल्या एका कॉलेजमध्ये शिकायचे.

जपानचे सम्राट अकिहितो यांची नात असलेल्या माकोनं आपलं नाते लपून न ठेवता जगापुढे आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. यामुळे अनेकांना धक्काही बसला होता तर काहींनी तिच्या धाडसी निर्णयाचं कौतुकही केलं होतं. जपान राजघराण्यातल्या व्यक्तीला सामान्य नागरिकांशी विवाह करण्याचा अधिकार नाही. जर राजघराण्यातील एखादी व्यक्ती असं करत असेल तर तिला पदत्याग करावा लागतो. विशेष म्हणजे हा कायदा फक्त राजघराण्यातल्या महिलांसाठीच लागू आहे. लग्नानंतर ती व्यक्ती राजघराण्यातील सदस्य न राहता एक सामान्य नागरिक बनते. याची पूर्वकल्पना असताना देखील ऐशोआराम आणि अलिशान महालात न रमता तिने एका सामान्य माणसासारखं जीवन व्यतीत करण्याचा निर्णय मनाशी पक्का केला. रविवारी पत्रकार परिषद घेऊन तिनं आपल्या लग्नाची घोषणा केली आहे. २०१८ मध्ये आपण विवाहबंधनात अडकणार असल्याचंही माकोनं सांगितलं आहे.

‘केईला पाहताचक्षणी मी त्याच्या प्रेमात पडले होते. त्याच्या हसऱ्या चेहऱ्यावर मी भाळले. लग्नानंतर शाही घराण्याची मी सदस्य नसेल, पण या निर्णयानं मी खूश आहे आणि माझ्या प्रियकरासोबत मी आनंदानं पुढील आयुष्य व्यतीत करेन’ असंही तिने रविवारी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं, यावेळी तिनं केई कोमूरोसोबत साखरपुड्याचीही घोषणा केली.